अंबानींच्या होणाऱ्या सुनेबाईंची दुबईमध्ये धमालमस्ती, मित्र-मैत्रिणींबरोबर साजरा केला अनंतचा बर्थडे, Photo व्हायरल

Anannt Ambani Birthday: मोठ्या सेलिब्रेटी स्टार कीड्सच्या बर्थडे (Star Kids Birthday Party) पार्टीची बातचं काही न्यारी असते. या महागड्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड सेलिब्रेटी (Bollywood), महागडे हॉटेल, संगीत, डान्स आणि धमाल मज्जा मस्ती असते.  सध्या अशाच एका बर्थेडे पार्टीची सर्वत्र चर्चा आहे आणि ती म्हणजे अनंत अंबानीचा (Anant Ambani Birthday Party at Dubai) वाढदिवस. सध्या या पार्टीतले काही इनसाईड फोटोज हे व्हायरल झाले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Apr 13, 2023, 06:41 PM IST
अंबानींच्या होणाऱ्या सुनेबाईंची दुबईमध्ये धमालमस्ती, मित्र-मैत्रिणींबरोबर साजरा केला अनंतचा बर्थडे, Photo व्हायरल title=

Anannt Ambani Birthday: अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट (Radhika Merchant) सध्या दुबईमध्ये आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा, अनंताचा वाढदिवस एन्जॉय करताना दिसली. 10 एप्रिल रोजी अनंतचा 28 वा वाढदिवस होता. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटीही या बर्थडे पार्टीला (Anant Ambani Birthday Party) उपस्थित होते. राधिकानं अनंतचा वाढदिवस आपल्या मित्रपरिवारांसोबत साजरा केला आहे. यावेळी तिनं स्कायडायव्हिंग केल्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. सोबतच तिचा पार्टीतलाही एक फोटो व्हायरल झाला आहे.

त्यामुळे सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे अनंत अंबानीच्या वाढदिवसाची. या पार्टीला न्यासा देवगनही (Nysa Devgan) उपस्थित असल्याचे कळते आहे तेव्हा तुम्हीही अनंत अंबानीच्या बर्थडे पार्टीतले इनसाईड फोटोज पाहिलेत का? 

मागच्या वर्षी अनंत अंबानीनं आपला वाढदिवस हा जामनगर येथील रिलायन्स टाऊनशिप रिफाइनरी येथे आपला वाढदिवस साजरा केला होता. यावेळीही संगीत, डान्स आणि मस्त धमाल मस्ती असणाऱ्या हाय फंडू पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्टॅड अप कॉमेडीचेही आयोजन करण्यात आले होते. 

या महिन्यातच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा संपन्न झाला. त्यांच्या या साखरपुड्याचे (Radhika Merchant Engagement) फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल झाले होते. त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. 

लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन

अनंत अंबानीचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायक आतिफ असलमचा (Atif Aslam) लाईव्ह परफॉर्मन्सही आयोजित करण्यात आला होता. यावेळी राहत फतेह अली खानही आपल्या बॉडीगार्ड चित्रपटातील तेरी मेरी हे गाणं गायले. सोबतच काही नामवंत रॅपर्सनंही आपल्या हटके गाण्यांची झलक पाहुण्यांसमोर पेश केली. 

राधिका मर्चंटचं स्कायडाव्हिंग 

नुकतेच काही फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत ज्यात राधिका मर्चंट आपल्या मित्रांसमवेत स्कायडायव्हिंग करताना दिसते आहे. यावेळी तिनं फार महागडे कपडेही परिधान केले होते. त्यातून या स्कायडायव्हिंगला तिच्यासोबत सोशल मीडिया इन्फ्लूयन्सर (Radhika Merchant Skydiving) ओरीही दिसला होता. 

सध्या त्यांच्या एका पार्टीतलेही काही व्हिडीओज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये राधिकाही पांढऱ्या आऊटफिटमध्ये दिसते आहे. ते एका महागड्या हॉटेलमध्ये डिनर एन्जॉय करताना दिसत आहेत. नुकतीच राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'मध्ये (Radhika Merchant and Anant Ambani NMACC) हजेरी लावली होती यावेळी अनंतच्या घड्याळाची तर राधिकाच्या बॅगेची जोरदार चर्चा रंगली होती. त्यांची किंमत ही सर्वाधिक होती ज्यातून आपण कदाचित एक अनेक घरं विकत घेऊ.