ED च्या कारवाईनंतर राज कुंद्राच्या इन्स्टाग्राम स्टोरीने वेधलं लक्ष, म्हणाला 'एक निश्चित वेळ...'

आता राज कुंद्राच्या एका सोशल मीडियावर स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

नम्रता पाटील | Updated: Apr 19, 2024, 05:46 PM IST
ED च्या कारवाईनंतर राज कुंद्राच्या इन्स्टाग्राम स्टोरीने वेधलं लक्ष, म्हणाला 'एक निश्चित वेळ...' title=

Raj Kundra Instagram Story : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राविरोधात ईडीने मोठी कारवाई केली. ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या मालकीची 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात शिल्पा शेट्टीचा जुहूमधील बंगल्याचाही समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी राज कुंद्रा किंवा शिल्पा शेट्टीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता राज कुंद्राच्या एका सोशल मीडियावर स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

राज कुंद्रा नेमकं काय म्हणाला?

राज कुंद्राने इन्स्टाग्रामवर दोन स्टोरी शेअर केल्या आहेत. यातील पहिल्या स्टोरीत त्याने डरकाळी फोडणाऱ्या सिंहाचा फोटो शेअर केला आहे. "जेव्हा तुमचा अपमान होतो असं वाटत असतं, तेव्हा शांत राहायला शिका. कारण यामुळे तुमची वेगळ्या प्रकारे प्रगती होते", असे राज कुंद्राने म्हटले.

Raj Kundra Instagram Story

इन्स्टाग्राम स्टोरीची सर्वत्र चर्चा 

तर दुसऱ्या स्टोरीत त्याने "चांगला व्यक्ती असण्याची एक निश्चित वेळ असते आणि वेळीच एखादी गोष्ट थांबवण्याची निश्चित वेळ असते", असे म्हटले आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात झालेल्या ईडी कारवाईनंतर सध्या ते दोघेही चर्चेत आहेत. याबद्दल त्या दोघांनीही जाहिररित्यात प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता राज कुंद्राच्या इन्स्टाग्राम स्टोरीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

Raj Kundra Story

दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आता त्यांचे वकील प्रशांत पाटील यांनी त्यांच्या वतीने एक निवेदन जारी केले होते. "शिल्पा आणि राज हे पूर्णपणे निर्दोष आहेत. ते तपासात पूर्ण सहकार्य करतील. त्यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या कारवाईनंतर आम्ही कायद्याचे पूर्णपणे पालन करु. तसेच मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांच्या सरंक्षणासाठी योग्य ती पावले उचलू", असे या निवेदनात म्हटले होते.

नेमकं प्रकरण काय?

शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राविरोधात पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या मालकीची 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात शिल्पा शेट्टीचा जुहूमधील बंगल्याचाही समावेश आहे. प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.