सुपरस्टार रजनीकांतने केला 'या' व्यक्तीचा घोर अपमान? Video व्हायरल झाल्यावर चाहते संतापले

Rajinikanth Viral Video : सध्या व्हायरल (Rajinikanth insulting his house helper) होत असलेल्या व्हिडीओमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगला नेमकं काय घडलं? पाहुया...

सौरभ तळेकर | Updated: Mar 5, 2024, 07:08 PM IST
सुपरस्टार रजनीकांतने केला 'या' व्यक्तीचा घोर अपमान? Video व्हायरल झाल्यावर चाहते संतापले title=
Rajinikanth, Anant Ambani wedding

Rajinikanth insulting his house helper : अनंत अंबानी अन् राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगला (Anant Ambani wedding) अख्ख बॉलिवूड जामनगरमध्ये अवरतलं होतं. किंग खानपासून नुकताच प्रसिद्धीच्या उंचीवर पोहोचलेल्या ऑरीने देखील प्री वेडिंगला हजेरी लावली होती. तिन्ही खान पहिल्यांदाच एकत्र नाचताना दिसले. तर दाक्षिणात्य कलाकार देखील अंबानींच्या लग्नाला हजर होते. अशातच या प्री वेडिंगला साऊथचे सुपरस्टार अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांनी देखील हजेरी लावली होती. रजनीकांत यांनी साध्या पोशाखात लग्नात हजेरी लावल्याने अनेकांनी त्यांचं कौतूक केलं होतं. निळा टी-शर्ट आणि जिन्सची पॅन्ट असा लूक रजनीकांत होता. मात्र, प्री-वेडिंगवरून परतत असताना रजनीकांत यांनी केलेल्या एका कृतीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. 

नेहमी झुकून प्रेक्षकांना नमस्कार करणाऱ्या रजनीकांत यांचा स्वभाव अनेकांना भावतो. अतिशय नम्रपणे आपलं म्हणणं रजनीकांत लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे अनेक चाहते त्यांना देवासारखं मानतात. मात्र, सध्या व्हायरल (Viral Video) होत असलेल्या व्हिडीओमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगला नेमकं काय घडलं? पाहुया...

अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंगमध्ये पापाराझींनी विमानतळाबाहेर हजेरी लावली होती. त्यावेळी रवाना होणाऱ्या पाहुण्याचं फोटोशूट सुरू होतं. त्यावेळी रजनीकांत यांनी साध्या अंदाजात एन्ट्री मारली. त्यावेळी त्यांच्यासोबत कुटूंब देखील होतं. फोटो घेण्यासाठी रजनीकांत यांनी पोज दिली. त्यावेळी त्यांनी कुटूंबाला देखील फोटोमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी एक हाऊस हेल्पर महिला फोटोच्यामध्ये येत होत्या. त्यावेळी रजनीकांत यांनी हाताचा इशारा करत हाऊस हेल्पर महिलेला बाजूला उभं राहण्यास सांगितलं.

पाहा Video

दरम्यान, रजनीकांत यांनी ज्याप्रकारे महिलेला बाजूला होण्यास सांगितलं, त्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रजनीकांत यांना नेटकरी ट्रोल करत आहेत. रजनीकांत तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर अनेकांनी रजनीकांत यांची कृती योग्यच असल्याचं म्हटलं आहे.