अबबब!!!!सलमान खानची प्रॉपर्टी पाहून डोळे गरगरतील ..मुंबईपासून दुबईपर्यंत कोट्यवधींची संपत्ती

सलमान खानने 'मैने प्यार किया' या चित्रपटातून सलमान खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमानने जवळपास बॉलिवूडमध्ये 33 वर्षे पूर्ण केली आहेत. 

Updated: May 5, 2022, 11:03 AM IST
अबबब!!!!सलमान खानची प्रॉपर्टी पाहून डोळे गरगरतील ..मुंबईपासून दुबईपर्यंत कोट्यवधींची संपत्ती  title=

मुंबईः सलमान खान हा बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जातो. सलमानच्या प्रत्येक चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असते. इतकंच नाही, सलमान काय खातो, कुठे राहतो इथंपासून त्याच्या प्रत्येक खासगी गोष्टी जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते आतूर असतात, तर चला जाणून घेऊयात सलमान खानची एकूण संपत्ती किती आहे

सलमान खानने 'मैने प्यार किया' या चित्रपटातून सलमान खानने नायक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमानने आज जवळपास बॉलिवूडमध्ये 33 वर्षे पूर्ण केली आहेत. 

सलमान आपल्या कुटुंबासह मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. हे तीन मजली अपार्टमेंट आहे ज्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. ईदला नेहमी याच घराबाहेर येऊन तो चाहत्यांना भेटत असतो.

गॅलेक्सी अपार्टमेंटच नाही तर मुंबईजवळ पनवेलमध्येही सलमानचं 150 एकरात पसरलेले फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये जिम, स्विमिंग पूल, गार्डनसह सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. अनेक वेळा सलमान इथं वेळ घालवताना दिसतो.

सलमान खानची दुबईतही आलिशान प्रॉपर्टी आहे. दुबईच्या बुर्ज खलिफाजवळ सलमानची कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे. 

चाहत्यांमध्ये भाईजानच्या नावाने प्रसिद्ध असलेला सलमान आज फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या स्टार्समध्ये गणला जातो. रिपोर्ट्सनुसार, सलमान 3000 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्यात 'टायगर 3' आणि 'कभी ईद कभी दिवाळी'चा समावेश आहे.