सलमान खानच्या 'या' प्रॉपर्टीचे भाडे तब्बल 1 कोटी रुपये, पण यात राहतं कोण?

Salman Khan Santacruz Property Rent Is 1 CR : सलमान खानच्या एकूण संपत्तीचा आकडा हा खूप मोठा असला... त्यापैकी एक म्हणजे त्यानं भाडेतत्वावर त्याची एक प्रॉपर्टी आहे. त्याचं भाडं तब्बल 1 कोटी आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 25, 2023, 06:47 PM IST
सलमान खानच्या 'या' प्रॉपर्टीचे भाडे तब्बल 1 कोटी रुपये, पण यात राहतं कोण? title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Santacruz Property Rent Is 1 CR : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा खूप साधारण आयुष्य जगतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहेत. तो 1BHK फ्लॅटमध्ये राहतो याची देखील अनेकांना कल्पना ही असेलच. पण त्याशिवाय सलमानच्या अनेक प्रॉपर्टी आहेत ज्याविषयी अनेकांना ठावूक नाही. सलमानकडे मुंबईच्या सांताक्रूज परिसरात चार माळ्याची एक बिल्डिंग आहे. सलमाननं ही जागा 2012 मध्ये जवळपास 120 कोटींसाठी घेतली होती. रिपोर्ट्सनुसार, सलमानचे वडील सलीम खान यांनी रिटेल चेन फूड हॉलसोबत या ठिकाणासाठी डिल केली होती. 

सलमानच्या या डिलला पुढे जाणून किशोर बियानी यांच्या फ्यूचर ग्रुपकडून पाठिंबा मिळाला. त्यांनी त्यावेळी त्यांनी पाच वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट केला. त्यावेळी पाच वर्षांसाठी त्यांनी दर महिन्याला 80 लाख असं भाडे देण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर हे भाडं वाढून 89.60 लाख दर महिन्याचं भाडं झालं. त्यावेळी फ्यूचर ग्रुपनं त्याला 2.40 कोटींची डिपॉजिट देखील दिलं होतं. सुरुवातीचे पाच वर्षे झाल्यानंतर, या कराराला दोन वर्षासाठी वाढवण्यात आलं. तर त्यावेळी दुसऱ्या वर्षापासून महिन्याचं भाडं हे 94.01 लाख असेल असं ठरवण्यात आलं. त्यावेळी असं सांगण्यात आलं की त्यांनी भाडं न दिल्यानं सलमान खानला हा बॉन्ड तिथेच संपवायचा होता. तो नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनलला गेला आणि त्यानंतर सलमानच्या बाजूनं निर्णय निघाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता असे म्हटले जाते की सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाला एक भाडेकरू मिळाला आहे. ते आता या प्रॉपर्टीला लॅन्डक्राफ्ट रिटेलला भाडेतत्वावर देण्यासाठी तयार झाले. त्यातून सलमानला दरमहिन्याला 1 कोटी रुपये भाडं मिळणार आहे. सलमान खानकडे फक्त ही एक प्रॉपर्टी नाही. तर त्याचा पनवेलला आलिशानं फार्महाऊस आहे. तिथे सलमान अनेकदा कुटुंबासोबत वेळ व्यथित करताना दिसतो. 

हेही वाचा : VIDEO : नम्रता संभेरावचं आगरी भाषेवरील प्रभुत्व पाहून बोमन इराणी अवाक्; पुढे त्यांनी जे केलं ते कौतुकास्पद!

दरम्यान, सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सलमान खान लवकरच 'टाइगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 13 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मनीष शर्मा यांचा हा चित्रपट स्पाय यूनिव्हर्समध्ये आहे. तर चित्रपटात शाहरुख खान पठाणच्या भूमिकेत पाहूण्या कलाकार म्हणून दिसणार आहे.