बाथरुममध्ये आई-मुलीचा मृतदेह कुजला..., 'त्या' अभिनेत्रीची गोष्ट जिची नोकरांनीच केली होती हत्या

Actress who Brutally Murdered by Servants : लोकप्रिय अभिनेत्री जिच्या तीन नोकरांनी मिळून केली होती तिची निर्घृण हत्या...

दिक्षा पाटील | Updated: May 3, 2024, 01:55 PM IST
बाथरुममध्ये आई-मुलीचा मृतदेह कुजला..., 'त्या' अभिनेत्रीची गोष्ट जिची नोकरांनीच केली होती हत्या title=
(Photo Credit : YouTube Video Grab from Filmfeel Malyalam)

Actress who Brutally Murdered by Servants :  80 च्या दशकातील एक अभिनेत्री जिच्या तीन नोकरांनी मिळून हत्या केली आहे. त्या अभिनेत्रीच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. इतकंच नाही तर अभिनेत्रीची हत्या केल्यानंतर त्यांनी तिचं शव हे बाथरुममध्ये बंद करुन ठेवलं होतं. ही अभिनेत्री मल्याळम चित्रपटसृष्टीतील असून तिचं नाव राणी पद्मिनी असं होतं. राणी यांची वयाच्या 24 व्या वर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. फक्त राणी नाही तर त्यांच्या आईची देखील त्या लोकांनी निर्घृण हत्या केली होती. राणी पद्मिनी आणि त्यांच्या आईचे रक्तानं माखलेले मृतदेह बाथरूममध्ये एकमेकांच्या अंगावर पडले होते. दरवाजा बंद होता आणि उग्र वास येत होता. ही घटना 15 ऑक्टोबर 1986 रोजी घडली तर नेमकं त्या दिवशी काय झालं ते जाणून घेऊया. 

राणी पद्मिनी आणि त्यांची आई इंदिरा चैन्नईच्या अन्ना नगर वेस्टमध्ये असलेल्या एका आलिशान बंगल्यात राहत होत्या. राणी पद्मिनी या काही महिन्यांआधीच त्या बंगल्यात शिफ्ट झाल्या होत्या. राणी पद्मिनी यांनी मल्याळमशिवाय तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये काम केलं. त्यांनी खरेदी केलेला हा बंगला आधी एका डॉक्टरचा होता आणि एका रियल ईस्टेटनं ती डील करुन दिली होती. 

जेव्हा 15 ऑक्टोबरला रियल ईस्टेट एजेंट हा राणी पद्मिनीच्या घरी गेला तर कोणी दरवाजा उघडला नाही. परत जाणार तितक्यात त्याला घरातून खूप घाण वास किंवा दुर्गंध आला. ते पाहता त्या एजंटनं घरात जाण्याचा विचार केला आणि कसाबसा तो किचनच्या दरवाजातू घरात गेला. तर त्यानं पाहिलं की घरातील सगळा सामान अस्था-व्यस्थ झाला आहे. त्यानं तिथूनच पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस बंगल्यावर पोहोचले तर त्यांनाही बाथरुममधून वास येतोय. त्यांच्या लक्षात आलं की काही तरी सडल्याचा वास येतोय. दरवाजा उघडला तर पाहिलं पद्मिनी आणि तिच्या आईचं शव रक्तानं भरलेलं असून एकमेकांवर ठेवण्यात आलं आहे. त्यांचं शव हे कुजलं होतं, इतकंच नाही तर ते शवं तिथून बाहेर काढण्याच्या देखील अवस्थेत नव्हते. द हिंदूनं दिलेल्या रिपोर्टनुसार, तिथेच पोलिसांनी त्यांच्या टीमला पाहून शवचं पोस्टमार्टम केलं. त्यानंतर शव पॉलिथीनमध्ये पॅक करून शवागृहात नेण्यात आले. 

राणी पद्मिनीच्या मानेवर, पोटावर आणि छातीवर चाकूचे 12 निशान होते तर आईच्या शरीरावर 14. त्याचं शव जवळपास 10 दिवस शवागृहात होतं. त्यानंतर कुटुंबातील कोणी आलं नाही हे पाहून मल्याळम अभिनेता मोहन यांनी त्यांचा प्रार्थीवावर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. तितक्यात राणी पद्मिनीचे मामा आले आणि त्यांनी त्या दोघांचे अंत्यविधी केल्या. 

राणी पद्मिनी इतकी श्रीमंत होती की आधी ती भाड्यावर राहत होती तेव्हाच तिनं नोकर कामावर ठेवले. तिनं त्यांची कोणतीही चौकशी न करता त्यांना कामावर ठेवलं. त्या तिघांचे क्रिमिनल रेकॉर्ड असल्याचे म्हटले जाते. जपराज जो राणी यांचा ड्रायव्हर होता तो क्रिमिनल होता. तो गाड्यांची चोरी करायचा. तर जो वॉचमन होता तो जपराजचा मित्र होता. जपराजनं राणी पद्मिनी यांची हत्या केल्यानंतर त्यांची गाडी चोरली होती. राणी पद्मिनी आणि तिची आई रोज रात्री मद्यपान करायचे. एक दिवस मद्यपान करत असताना तिची आई किचनमध्ये गेली आणि तेव्हाच त्या नोकरांनी तिच्यावर हल्ला केला. आईची किंचाळी ऐकून राणी पद्मिनी तिथे आल्या तर त्यांचीही त्या नोकरांनी हत्या केली. त्या दोघींची हत्या केल्यानंतर ड्रायव्हर, वॉचमन आणि कूकनं घरात असलेले रक्कम, दागिनी आणि निसान कार चोरून पळून गेले. 

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून भाजप आणि आदित्य ठाकरे यांच्यात का जुंपली? वाचा नेमके काय घडलं

पोलिसांनी डबल मर्डरची चौकशी सुरु केली. त्यानंतर गाडीला ट्रेस करत त्यांनी आठवड्याच्या शेवटी ड्रायव्हर, कूक आणि वॉचमनला अटक केली. जपराज तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच त्याचे निधन झाले. तर वॉचमॅनची सुटका करण्यात आली. तर तिसरा आरोपी हा पळून गेला तो कुठे गेला कोणाला काही कळलं नाही.