अ‍ॅडल्ट स्टार असल्यामुळे माझ्याविषयी...; स्वत:विषयी वेडंवाकडं ऐकून सनी लिओनी भावूक

Sunny Leone Shocking Revelations: सनी लिओनीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यावर एक एडल्ट स्टार म्हणून कशा प्रकारे बातम्या लिहिण्यात आल्या. इतकंच काय तर तिला कसं काम मिळत नव्हतं आणि त्याशिवाय आणखी अशा अनेक गोष्टींचा सनी लिओनीनं खुलासा केला. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 9, 2023, 05:37 PM IST
अ‍ॅडल्ट स्टार असल्यामुळे माझ्याविषयी...; स्वत:विषयी वेडंवाकडं ऐकून सनी लिओनी भावूक title=
(Photo Credit : Social Media)

Sunny Leone Shocking Revelations: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली. यावेळी सनी ही तिच्या कॅनेडी या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी तिथे पोहोचली होती. खरंतर सनीसाठी हा खूप महत्त्वाचा क्षण होता. कारण सनीचं जे बॅकग्राईऊंड होतं तिथून इथपर्यंत येणं हे तिच्यासाठी कठीण होतं. इतका खडतर प्रवास करण्यासाठी सनीला खूप मेहनत करावी लागली. सगळ्यात आधी सनीला एक एडल्ट स्टार म्हणून ओळख मिळाली आणि त्यानंतर तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळवणं खूप कठीण होतं. त्यासाठी तिला खूप वेळ लागला. रिपोर्ट्सनुसार, सनीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यात झालेल्या या बदलाविषयी सांगितलं की हे अविश्वसनीय आहे.  

सनीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या या स्ट्रगलविषयी सांगितलं आहे. या मुलाखतीत सनीनं एडल्ट एंटरटेनरमेंट स्ट्रीम ते बिग बॉसमध्ये येण्यापर्यंत आणि त्यानंतर तिचा बॉलिवूडमध्ये पदार्पणापर्यंत अनेक गोष्टींविषयी सांगितले. याविषयी बोलताना सनी म्हणाली, तुम्ही तुमच्या आयुष्यात कसे बदल करतात किंवा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कसे पोहोचता हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्यातूनचं तुमची एक प्रतिमा तयार होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे सनीनं सांगितलं की "चित्रपटसृष्टीत तिचं पदार्पण हे काही सोपं नव्हतं. एका एडल्ट मुव्ही स्टार असण्यामुळे तिला अनेक ब्रॅंड्सच्या जाहिरातींसाठी आणि चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तिच्याविषयी अनेक बातम्या लिहिण्यात आल्या, या बातम्यांमध्ये तिच्याविषयी अनेक वाईट गोष्टी सांगण्यात आल्या होत्या आणि हे सगळं तिच्यासाठी सोपं नव्हतं. पण सनी तिथे थांबली नाही कोणाला घाबरली नाही आणि तिच्या पद्धतीनं पुढे होत गेली." 

दरम्यान, भावूक झालेली सनी तिच्या 'कॅनेडी' म्हणाली, चित्रपटाचे दिग्दर्शन हे अनुराग कश्यपनं एक अभिनेत्री म्हणून सिद्ध करून दाखवण्यासाठी मला एक संधी दिली आहे. असं या आधी कोणत्याच चित्रपट निर्मात्यानं केलं नाही. 

हेही वाचा : दीपिकानं दिला जुळ्या मुलांना जन्म? पतीची पहिली प्रतिक्रिया...

सनी लिओन ही फक्त एक अभिनेत्री नाही तर त्यासोबतच ती एक बिझनेस वुमन देखील आहे. सनीची एकूण संपत्ती किती आहे हे तुम्हाला माहित आहे का? सनीच्या कमाई विषयी बोलायचे झाले तर एका चित्रपटात काम करण्यासाठी सनी ही 1.2 कोटी रुपये मानधन म्हणून घेते. सनीचं एक कॉस्मॅटिक ब्रॅंड देखील आहे. यासोबत तिचा फ्रेग्रंसचा देखील एक बिझनेस आहे. तर महिलांच्या फॅशनवर बेस्ड असलेलं एक ब्रॅंड देखील आहे.