'कपिल शर्मा शो पाहून किळस येतो' सुनील ग्रोव्हरच्या कृतीवर कॉमेडियनला भडकला

कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सध्या कपिल शर्माच्या शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये दिसत आहे. 

Updated: May 14, 2024, 07:14 PM IST
'कपिल शर्मा शो पाहून किळस येतो' सुनील ग्रोव्हरच्या कृतीवर कॉमेडियनला भडकला  title=

मुंबई : अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सध्या कपिल शर्माच्या शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये दिसत आहे. या कार्यक्रमात तो वेगवेगळी पात्र साकारतोच पण त्याचं डफली हे पात्र खूप गाजलं,  ज्यामध्ये तो साडी नेसून येतो आणि आपल्या कॉमेडीने सगळ्यांना हसवतो. प्रेक्षकांना त्याची व्यक्तिरेखा आवडते पण कॉमेडियन सुनील पाल याला वैतागला आहे. असं त्याने त्याच्या दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

नुकतीच सुनील पालने टाईम्स नाऊला मुलाखत दिली. यावेळी त्याने कपिल शर्मा शोबद्दलचे अनेक खुलासे केले. इतकंच नाही तर कपिल शर्माच्या शोमध्ये पुरुषांनी महिला म्हणून दिसणं चुकीचे असल्याचंही तो म्हणाला. इतकंच नाही तर त्या शोमध्ये होणारी कॉमेडीही खूप वल्गर असल्याचं अभिनेत्याने म्हटलंय. यावेळी बोलताना अभिनेता म्हणाला, सुनील ग्रोव्हर एका महिलेप्रमाणे वागतो आणि लोकांच्या मांडीवर बसतो. मला याचा खूप तिरस्कार आहे, तो बायकांचे कपडे घालतो आणि अश्लील बोलतो. ते दिसताना चांगलं दिसत नाही, ते खूप चीप आणि खराब दिसतं. ग्रोव्हरने दाखवल्याप्रमाणे महिला हतबल नसतात. कपिलच्या शोमध्ये हे सगळं दाखवण्याऐवजी खरी कॉमेडी दाखवली पाहिजे, असंही कॉमेडी अभिनेता म्हणाला.

सुनील पालने असंही सांगितलं की, नेटफ्लिक्स बोल्ड आणि अश्लील कंटेटसाठी ओळखलं जातं आणि कपिल शर्माला नेटफ्लिक्सने या प्लॅटफॉर्मवर आपला शो प्रसारित करण्यासाठी कसं आमिष दाखवलं याचं त्याला आश्चर्य वाटतं. याशिवाय त्याने शोच्या स्क्रिप्टवरही ताशेरे ओढले. तो म्हणाला, "40 लेखक असूनही हा शो नवीन काही करू शकला नाही." प्रत्येकजण थकलेला दिसत होता आणि त्यांच्यात एनर्जीच नाही. असंही अभिनेता यावेळी बोलताना म्हणाला.

यावेळी कपिलचा शो नेटफ्लिक्सवर येतो. याबाबत बोलताना सुनील पालने सांगितलं की, "कपिल हा वन मॅन शो आहे आणि त्याने टीव्हीवर परतावे."  कपिल शर्मा शो कपिललाच नाही तर त्याच्या चाहत्यांनाही हा शो टीव्हीवर परतावा अशी इच्छा आहे.