Best Protein Rich Foods : मजबुत शरीरयष्टीसाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!

आहारात या पदार्थांचा समावेश करा, शरीर मजबूत होईल!  

Updated: Oct 3, 2022, 11:41 PM IST
 Best Protein Rich Foods : मजबुत शरीरयष्टीसाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश! title=

High Protein Vegetarian Food : आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण सर्वजण स्वतःची काळजी घेणे विसरतो, ज्यामुळे अनेक वेळा आपल्या शरीरात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अनेक आवश्यक पोषक घटकांची कमतरता असते. आहार नीट न घेतल्यास प्रथिनांची कमतरता निर्माण होते, त्यामुळे शरीरात अॅनिमियासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. शरीरात प्रथिनांच्या कमतरतेची अनेक लक्षणे दिसतात, जसं की अशक्तपणा, शरीरातील स्नायूंची जास्त प्रमाणात झीज होणे इ. आजकाल मांसाहारापेक्षा शाकाहारी जेवणाला कमी लेखले जाते. (best high protein vegetarian diet for body building Health Tips)

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की मांसाहारी अन्नापेक्षा शाकाहारी अन्नामध्ये कमी प्रथिने आढळतात. आम्ही तुम्हाला सांगतो की संपूर्ण जगात असे 22% लोक शाकाहारी आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यात प्रथिने भरपूर असतात आणि तुम्ही त्यांचा आहारात समावेश केलाच पाहिजे.

पनीर 
पनीर हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. कोणत्याही लग्नकार्यात, पूजेमध्ये पनीर आपल्याला दिसतं. चीजमध्ये भरपूर प्रमाणत प्रथिने आढळतात. त्यासोबतच पनीरमध्ये कॅल्शिअमही चांगले असते. त्यामुळे पनीरचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. 

राजमा
राजमा आणि भात भारतात खूप आवडीने खाल्ले जातात. राजमामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. तुम्हाला हवे असल्यास ते उकडूनही खाऊ शकता.

हरभरा
हरभरा आहारात असेल तर तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. चण्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हरभऱ्याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि जास्त वेळ भूक लागत नाही.

डाळ 

सर्व प्रकारच्या डाळींमध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक तत्व असतात. तुम्ही ते चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)