पीसीओएसग्रस्त स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण जास्त, अशी घ्या काळजी

गंभीर समस्या म्हणून बघणे आणि योग्य वेळा या आजारावर उपचार करणे ही काळाची गरज 

Updated: Sep 20, 2020, 04:21 PM IST
पीसीओएसग्रस्त स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण जास्त, अशी घ्या काळजी title=

मुंबई : पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिण्ड्रोम (पीसीओएस) या अवस्थेमध्ये अंडाशयांत छोटी पाण्याने भरलेली गळवे (सिस्ट) मोत्याच्या आकारात चिकटलेली असतात. याशिवाय हार्मोन्सचे असंतुलन दिसून येते. पुरुषांमध्ये आढळणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण स्त्रियांमध्ये वाढते आणि इन्सुलिनच्या चयापचयावर वाईट परिणाम होतात, मासिक पाळी अनियमित होते व रक्तस्रावही कमी होतो. गेल्या काही वर्षांत पीसीओएस असलेल्या स्त्रियांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पीसीओएसकडे एक गंभीर समस्या म्हणून बघणे आणि योग्य वेळा या आजारावर उपचार करणे ही काळाची गरज असल्याचे नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. रितु हिंदुजा यांनी म्हटलंय.

पीसीओएसग्रस्त स्त्रियांना पुढील आयुष्यात वंध्यत्व, हायपरलीडिमिया, हृदयविकार तसेच हायपरटेन्शन हे विकार होण्याचा धोका अधिक असतो.पीसीओएसने ग्रासलेल्या स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण जास्त असतो. कारण त्यामुळे अनियमित ओव्यूलेशन होते किंवा ओव्यूलेशन होत नाही. वैद्यकीय मदतीशिवाय गर्भधारणा होणे त्यामुळे कठीण असते.

बैठी जीवनशैली, तणाव, अनियमित व चुकीच्या आहाराच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे हा आजार होतो. यातून स्थूलत्व, ओव्हल्युशनवर परिणाम झाल्याने गर्भधारणेत समस्या, लवकर गर्भधारणा न होणे, गर्भपात गोणे आणि गरोदरपणात मधुमेह होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.पीसीओएस असलेल्या ज्या स्त्रियांना गर्भधारणा झालेली असते अशा स्त्रियांवर गर्भारपणात खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. 

कारण ह्या स्त्रियांना तीन पट जास्त गर्भपाताचा धोका असतो. गर्भारपणातील मधुमेह आणि अकाली प्रसूती हे पीसीओएस चे आणखी काही दुष्परिणाम आहेत जे गर्भारपणात आढळू शकतात. गर्भारपणात मेटफोर्मीन घेण्याचा सल्ला डॉक्टर घेऊ शकतात त्यामुळे गर्भपाताची शक्यता कमी होते.पीसीओएस असलेल्या गर्भवती स्त्रीला नियमित व्यायामाची गरज असते. 

हलके व्यायाम केल्याने इन्सुलिनचा वापर शरीर करू लागते, त्यामुळे संप्रेरकांचे संतुलन होते आणि वजन नियंत्रित राहते. चालणे आणि हलके व्यायाम हे गर्भवती स्त्रीसाठी सर्वोत्तम व्यायाम प्रकार समजले जातात. पीसीओएस असलेल्या गर्भवती स्त्रीचा आहार सुद्धा महत्वाचा आहे. प्रथिने आणि तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात घेल्यास गर्भारपणात इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहते.

मुबंईच्या नोव्हा आयव्हीएफ फर्टीलिटीच्या फर्टीलिटी कन्सलटंट डॉ. रितु हिंदुजा सांगतात नुकतेच एक ३२ वर्षीय जोडपे मूल होत नसल्याची तक्रार घेऊन उपचाराकरिता आले होते. तीन वर्ष प्रयत्न करूनही मुल होत नसल्याने हे जोडपे चिंताग्रस्त झाले होते. चाचणी नंतर असे लक्षात आले की ही महिला पीसीओएस सारख्या आजाराने ग्रस्त होती आणि त्यामुळेच नैसर्गीकरित्या गर्भधारणा होत नसल्याचेही समजले. 

त्यानंतर आयव्हीएफ उपचार पध्दतीने या जोडप्याला पहिल्याच प्रयत्नात गर्भधारणा झाली.पीसीओएस सारख्या समस्येमुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा न होऊ शकणा-या स्त्रियांसाकरिता आयव्हीएफ ही उपचारपध्दत योग्य ठरते.  पीसीओएसच्या गंभीर प्रकरणांमध्ये अनेक महिलांना गर्भधारणा करणे अवघड होते. या प्रकरणांमध्ये अशा वेळी आयव्हीएफ उपचार पध्दतीची निवड करणे योग्य ठरते. 

इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) एक सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (एआरटी) चा एक प्रकार आहे जो शुक्राणूंना अंड्यात गर्भाधारणास देण्यास मदत करण्यासाठी औषधे आणि शल्यक्रिया प्रक्रियेचा उपयोग करून कार्य करते ज्यानंतर गर्भाशयात सुपिक अंडी रोपण केली जाते. 

प्रथम, एखाद्या स्त्रीला अंडी परिपक्व करण्यासाठी आणि गर्भधारणेसाठी तयार करण्यासाठी औषध लिहिले जाते. पुढे, डॉक्टर अंडी पुनर्प्राप्ती नावाची प्रक्रिया करते, ज्यानंतर, शुक्राणू आणि अंडी आयव्हीएफ लॅबमध्ये फलित होतात. त्यानंतर, चांगल्या प्रतीचे १ फलित अंडी (गर्भ) एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयात हस्तांतरित होतात आणि गर्भाशयाच्या अस्तरात गर्भाने रोपण केले तर ती स्त्री गर्भवती होऊ शकते.