Kitchen Tips : अर्धवट संपलेला Ice Cream चा फॅमिली पॅक फ्रिजमध्ये ठेवता? तज्ज्ञ म्हणतात की...

Summer Special : Ice Cream खाल्ल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवताना चुका करणे तुम्हाला महागात पडू शकतं. 

नेहा चौधरी | Updated: May 5, 2024, 12:03 AM IST
Kitchen Tips : अर्धवट संपलेला Ice Cream चा फॅमिली पॅक फ्रिजमध्ये ठेवता? तज्ज्ञ म्हणतात की... title=
Kitchen Tips Keeping a half finished family pack of ice cream in the fridge Experts say

How To Store Left Over Ice Cream : मे महिन्याची सुरुवात झाली आहे. सूर्य आग ओकत आहे, अशात गारेगार पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाची होते. अशात घरोघरी लहान मुलांपासून मोठ्या मंडळींच्या जिभेची चव आणि मन तृप्त करण्यासाठी आईस्क्रिम आणलं जातं. वेगवेगळे चवीचे आईस्क्रिम बाजारात मिळतं. अनेक घरांमध्ये फॅमिली पॅकही आणला जातो. मग अर्धवट खाल्लेल आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवलं जातं. पण आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवताना काही चुका टाळा अन्यथा तुम्हा तो महागात पडू शकतं. त्यामुळे आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. (Kitchen Tips Keeping a half finished family pack of ice cream in the fridge Experts say )

आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत काय?

आईस्क्रिम हे दुधापासून बनवलं जातं. त्यामुळे ते व्यवस्थित ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. पण अनेक जण फ्रिजमध्ये आईस्क्रिम ठेवताना चुका करतात. त्यामुळे आईस्क्रिमची चव खराब होते आणि शिवाय ते आरोग्यासाठी हानीकारक ठरते. 

आईस्क्रिमचं फॅमिली पॅक बऱ्याचदा कागदी खोक्यात उपलब्द आहे. अशात अर्धवट आईस्क्रिमचं पॅक जेव्हा आपण फ्रिजरमध्ये ठेवतो. अशात आपण वारंवार फ्रिज किंवा फ्रिजर उघडतो अशामुळे तापमान कमी जास्त होतं. याचा परिणाम आईस्क्रिमच्या फॅमिली पॅकवर होतो. कागद असल्याने तो सैलसर पडत जातो. ज्यामुळे कागदी खोक्यामध्ये आईस्क्रिम कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका. आईस्क्रिम हे एअरटाईट डब्यात फ्रिजमध्ये स्टोर करावे. त्यामुळे आईस्क्रिम खराब होत नाही. 

आईस्क्रिम फ्रिजरमध्येच ठेवलं आहे म्हणजे ते सुरक्षित आहे, असं असंख्य लोकांचा समज असतो. त्यामुळे अनेक घरात आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवताना ते पाकिट व्यवस्थित आणि बंद करुन ठेवत नाही. अगदी प्लास्टिकच्या कंटेनरचं झाकणदेखील आपण न लावता तसंच ठेवून देतो. पण कागदी पाकिटातलं आईस्क्रिम बऱ्याचदा उघडंच राहतं आणि त्यामुळे आईस्क्रिमची चव खराब होते. 

उन्हाळा असल्याने राज्यात अनेक भागात लोडशेडिंग होतं. अशात लाईट गेल्यानंतर फ्रिजमधील आईस्क्रिम वितळतं. पण लाइट आल्यानंतर पुन्हा आईस्क्रिम घट्ट होतं. तज्ज्ञ सांगतात की असं पुन्हा घट्ट झालेलं आईस्क्रिम खाणं आरोग्यासाठी खराब असतं. कारण या प्रक्रियेमुळे आईस्क्रिममधील घटकांचं प्रमाण पूर्णपणे बदलेलं असतं जे आरोग्यासाठी धोक्यादायक असतं. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)