Physical Relation : सेक्सनंतर अचानक का रडू लागतात महिला? जाणून घ्या काय आहे यामागील कारण!

Physical Relation : सेक्सनंतर अनेक महिला रडत ( Women cry ) असल्याचं समोर आलंय. दरम्यान असं का होतं? असं होणं नॉर्मल आहे का? असा प्रश्न देखील समोर येतोय.  

Updated: Jul 12, 2023, 08:47 PM IST
Physical Relation : सेक्सनंतर अचानक का रडू लागतात महिला? जाणून घ्या काय आहे यामागील कारण! title=

Physical Relation : सेक्सचा ( Sex ) अर्थ हा प्रत्येक जोडप्यासाठी किंवा व्यक्तीसाठी वेगळा असण्याची शक्यता असते. ज्यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जोडीदारासोबत इंटीमेट ( Intimacy ) होता तेव्हा आनंदाची भावना तीव्र असते. मात्र सेक्सनंतर अनेक महिला रडत ( Women cry ) असल्याचं समोर आलंय. दरम्यान असं का होतं? असं होणं नॉर्मल आहे का? असा प्रश्न देखील समोर येतोय.  

सेक्सनंतर का रडतात महिला?

जर शारीरिक संबंध ( Physical Relation : ) ठेवल्यानंतर तुम्हाला रडू येत असेल तर यामध्ये काहीही चुकीचं नाही. अशा भावनांनंतर रडणं ही एक नैसर्गिक शारीरिक प्रतिक्रिया आहे. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर रडण्याच्या प्रक्रियेला देखील एक नाव आहे. याला पोस्ट-कोइटल ट्रिस्टेझ ( फ्रेंचमध्ये ट्रिस्टेस म्हणजे दुःख ) किंवा पोस्ट-कोइटल डिस्फोरिया ( Post-coital tristesse ) असं म्हटलं जातं. 

महिला सेक्सनंतर का रडतात?

एका संशोधनानुसार, महिला सेक्सनंतर रडणं हे फार सामान्य आहे. काहीवेळा महिलांना सेक्स केल्यानंतर वाईट वाटतं आणि मग त्या रडू लागतात. याला विज्ञानात पोस्ट कोइटल डिस्फोरिया (पीसीडी) म्हणतात. 

मन शांत

विज्ञानात असं म्हटलंय की, रडण्यानेही मन शांत होतं. जेव्हा स्त्रिया खूप उत्तेजित असतात, त्या वेळी त्यांच्या मेंदूच्या बहुतेक पेशी काम करू लागतात. अशावेळी त्यांच्या मनात विविध प्रकारच्या भावना येतात. दरम्यान सेक्सनंतर महिलांचं मन शांत व्हायचं असतं, त्यामुळेही त्या रडू लागतात. 

जोडीदार

सेक्स ( Sex ) केल्यानंतर स्त्रिया रडतात याला अजून एक कारण आहे, ते म्हणजे सेक्सनंतरही जोडीदाराने आपल्याशी बोलावं असं त्यांना वाटू लागतं. सेक्सनंतर पुरुष जोडीदाराला झोप लागली तर महिलांना याचं वाईट वाटतं. त्यामुळे हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे महिला भावूक होतात.

जास्त आनंद

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर महिलांना खूप आनंद होतो आणि अनेकदा याच आनंदामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. जेव्हा महिला त्यांच्या पार्टनरवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासोबत जवळीक साधल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो.

लाज वाटणं

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काहीवेळा महिलांना लाज वाटू लागते. यावेळी त्यांचा स्वतःवर विश्वास नाही. काहीवेळी चांगले शारीरिक संबंध ठेवता न आल्याने त्यांना लाज वाटते आणि त्या रडू लागतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)