Weight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल करते वजन कमी, असे करा सेवन

Lemon Peels For Weight Loss: अनेकांना आपल्या वाढत्या वजनाचे टेन्शन असते. आता वजन कमी करण्यासाठी व्यायामावर भर न देता सहज कमी करु शकता. लिंबाची साल वजन कमी करण्यासाठी कामी येते. लिंबाने वजन कमी कसे करावे हे माहित आहे. फक्त लिंबूच नाही तर त्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन कसे करावे ते जाणून घ्या.

Updated: Nov 8, 2022, 06:58 AM IST
Weight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल करते वजन कमी, असे करा सेवन  title=

Lemon Peels To Lose Fat: वाढत्या वजनामुळे अनेकांचे टेन्शन वाढते. मात्र, या टेन्शनवर लिंबाच्या सालीची मात्रा खूप फायदेशीर ठरत आहे. लिंबाची साल चरबी कमी करण्यासाठी मदत करत असल्याचे पुढे आले आहे. लिंबू वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. लिंबू आपण सगळेच वापरतो, पण त्याची साल काढून फेकून देतो. मात्र, ही साल तुम्ही फेकून देऊ नका. त्यात खूप काही दडलेलं आहे. लिंबाच्या सालीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात. याशिवाय लिंबाच्या सालीमध्ये डी-लिमोनेन (D-limonene) नावाचे तत्व असते जे चरबी कमी करण्यास मदत करते. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर कसा करू शकतो हे सांगणार आहोत. 

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात

लिंबाची साल केवळ वजन कमी करत नाही तर लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने इतरही अनेक आरोग्य फायदे मिळतात. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात. लिंबाच्या सालीमध्ये फ्लेव्होनॉइड्स
आढळतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात. जर तुम्ही तणावाखाली असाल तर तुम्ही लिंबाची साल खाऊ शकता. शरीरात चरबी वाढली की त्यामुळे विषारी पदार्थही वाढतात. लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी फॅट बर्न करण्यास मदत करते.

लिंबाच्या सालीपासून पावडर बनवा

लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असते जे चरबी कमी करण्यास मदत करते. लिंबाच्या सालीचे सेवन करण्यासाठी वाळवून त्याची पावडर तयार करा. ही पावडर हवाबंद डब्यात साठवा. ही पावडर कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता. त्याचेही खूप सारे लाभ मिळतात.

हे पेय तयार करा

वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीने वजन कमी करणारे पेय तयार करु शकता. हे पेय बनवण्यासाठी लिंबाची साल काढा आणि नंतर 2 लिटर पाण्यात सुमारे 30 मिनिटे उकळा. त्यानंतर गॅस बंद करुन सालं काढून टाका. हे पाणी रोज सकाळी प्या. त्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)