पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात फावडा घालून केली हत्या, नंतर रात्रभर मृतदेहाच्या...; अख्खं गाव हादरलं

उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यात पतीने पत्नी झोपेत असताना डोक्यात फावडा घालून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर पती रात्रभर पत्नीच्या मृतदेहाच्या शेजारी झोपून राहिला. सकाळी कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं.    

शिवराज यादव | Updated: May 19, 2024, 04:56 PM IST
पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात फावडा घालून केली हत्या, नंतर रात्रभर मृतदेहाच्या...; अख्खं गाव हादरलं title=

उत्तर प्रदेशाील हापूड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने रात्री झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात फावडा घालून तिची हत्या केली. आरोपीने दारुच्या नशेत ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर तो रात्रभर पत्नीच्या मृतदेहाच्या शेजारी बसून होता. सकाळी कुटुंबीयांनी दरवाजा उघडल्यानंतर समोर दिसणारं दृश्य पाहून हादरले. संपूर्ण गावात वाऱ्यासारखी ही बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी हत्येच्या आरोपीलाखाली पतीला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महेश असं आरोपीचं नाव असून, पत्नीचं नाव शितल आहे. 12 वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. महेशला दारुचं व्यसन होतं. लग्नानंतर तो रोज शीतलला मारहाण करायचा. शितल मेहनत करुन पती आणि सासू-सासऱ्यांचं पोट भरत होती. शनिवारी रात्री महेश दारुच्या नशेत घरी पोहोचला आणि झोपलेल्या शीतलवर फावड्याने वार केला. यामुळे शितलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

गावातच राहणाऱ्या नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलं की, आपल्याला सकाळी महेशने पत्नीची हत्या केल्याचं समजलं. माहिती मिळताच आपण घटनास्थळी पोहोचलो होतो. यावेळी शितलचा मृतदेह बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. महेश यावेळी बेडच्या शेजारीच बसला होता. घटनेची माहिती कोतवाली पिलखुवा पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शीतलचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. आरोपी महेशला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

महेश दिवसभर केलेल्या मजुरीतीला पैसा दारुवर उडवायचा असंही नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे शीतल मजुरीतून कमाई करत त्याच्या आई-वडिलांना सांभाळत होती. महेश नेहमीच शीतलच्या चारित्र्यावर संशय घेत असे. अखेर त्याने रात्री शीतलची हत्या केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.