...म्हणून आत्याने कुऱ्हाडीने वार करुन भाच्याला संपवलं! शरीरसंबंधांमुळे हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं

Angry Women Killed Relative: अनेकदा समज देऊनही हा मुलगा ऐकण्यास तयार नव्हता असा या आरोपी महिलेचा दावा आहे. तर पोलिसांनी मात्र या प्रकरणामध्ये वेगळाच दावा करताना या मुलाचे आणि त्याच्या आत्येबहिणीचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 4, 2023, 11:48 AM IST
...म्हणून आत्याने कुऱ्हाडीने वार करुन भाच्याला संपवलं! शरीरसंबंधांमुळे हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं title=
घरात वाद सुरु असतानाच महिलेने कुऱ्हाडीनं केला वार

Angry Women Killed Relative: उत्तर प्रदेशमधील (UP Crime News) चित्रकूटमध्ये (Chitrakoot) एका महिलेने आपल्याच भाच्याची हत्या केली. कुऱ्हाडीने वार करुन या महिलेने आपल्या भाच्याला संपवलं. आपल्या मुलीवर भाच्याची वाईट नजर होती असा दावा या महिलेने केला आहे. मागील काही दिवसांपासून माझा भाचा मुलीचा छेड काढत होता असंही या महिलेने म्हटलं आहे. अनेकदा आपण यासंदर्भात भाचाला समज दिली. त्यानंतर त्याला दमदाटी करुनही समजावण्याचा प्रयत्न केल्याचा या महिलेचा दावा आहे. दम देऊनही तो मुलीची छेड काढत असल्याने आणि थेट घरात येऊन तो मुलीची छेड काढू लागल्याने संतपालेल्या या महिलेने कुऱ्हाडी वार करुन त्याची हत्या केल्याचं सांगितलं.

नक्की घडलं काय?

ही धक्कादायक घटना 2 जूनच्या रात्री मऊ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या काशीनाथमधील पुरवा येथे घडली. आरोपी महिला आपल्या भाचाकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे वैतागली होती. या महिलेचा भाचा तिच्या मुलीची छेड काढायचा. आत्याने अनेकदा समजावल्यानंतरही हा मुलगा तिच्या मुलीची छेड काढायचा. शुक्रवारी (2 जून 2023 रोजी) रात्री 9 वाजता हा तरुण आपल्या आत्याच्या घरात शिरला. त्यानंतर तो त्याच्या आत्यासमोरच आपल्या आत्येबहिणीची छेड काढू लागला. त्यावेळी घरात या महिलेने आधी आपल्या भाचाला समजावण्याचा आणि घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काहीही ऐकण्यास तयार नव्हता. आत्या आणि भाचामध्ये आधी जोरदार बाचाबाची आणि नंतर धक्काबुक्कीपर्यंत हे प्रकरण गेलं. वारंवार सांगूनही भाचा ऐकत नसल्याने या महिलेने संतापाच्याभरात घरातील कुऱ्हाडीने आपल्याच भाच्यावर वार केले.

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

महिलेने कुऱ्हाडीने वार केल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला. यानंतर शेजाऱ्यांनी या तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल केलं. मऊ येथील रुग्णालयात या तरुणाला दाखल करण्यात आलं. मात्र कुऱ्हाडी करण्यात आलेला वार हा फारच खोलपर्यंत गेल्याने अतिरक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. 

दोघांमध्ये होते प्रेमसंबंध

या घटनेसंदर्भात पोलिसांना माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस अधिक्षक वृंदा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेला तरुण 22 वर्षांचा आहे. त्याच्या आत्यानेच त्याची हत्या केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये सध्या कोणत्याही प्रकारची तक्रार कोणीही दाखल केलेली नाही असंही पोलिसांनी सांगितलं. प्राथमिक तपासामध्ये या तरुणाचे त्याच्या आत्याच्या मुलीशी शरीरिकसंबंध होते अशी माहिती समोर आली. दोघांचं प्रेमप्रकरण सुरु असल्याने याच वादातून महिलेने भाच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.