Corona Vaccineमुळे पुरूष होतात नपुंसक तर महिलांना येतं वंधत्व? पाहा काय आहे सत्य

 देशातचं नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. 

Updated: Jun 22, 2021, 12:07 PM IST
Corona Vaccineमुळे पुरूष होतात नपुंसक तर महिलांना येतं वंधत्व? पाहा काय आहे सत्य title=

मुंबई : देशातचं नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लसीकरण सुरू आहे. देशात 18 वर्षांच्या पुढील व्यक्तींच्या लसीकरणास सुरूवात झाली आहे. पहिल्याचं दिवशी 86.16 लाख लोकांचं लसीकरण पुर्ण करण्यात आलं आहे. कोरोनाव्हायरस विरूद्ध लसीकरण कार्यक्रम सरकारने तीव्र केला आहे. पण या दरम्यान लस घेतल्यानंतर पुरूष नपुंसक होतात  तर महिलांना येतं वंधत्व येत असल्याची चिंता लोकांना सतावत आहे. लोकांच्या या चिंतेवर सरकारने उत्तर दिलं आहे. 

कोरोना लस घेतल्यानंतर पुरूष नपुंसक तर महिला वंधत्वच्या शिकार होत असलेल्या चर्चांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही, असं स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेने (Union Health Ministry)दिलं आहे.  कोरोनालस प्रभावी असल्याचं देखील मंत्रालयाने सांगितलं आहे. त्यामुळे कोरोना लस घेण्यास त्याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही असं स्पष्ट होत आहे. 

मंत्रालयाने त्यांच्या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या एफएक्यूमध्ये स्पष्ट केलं आहे की, 'लस प्रजनन क्षमतेला प्रभावी करत नाही. करण सर्व लसींची चाचणी सर्वप्रथम प्राण्यांवर करण्यात आली आहे. त्यानंतर माणसांना लस देण्यात आली आहे.' त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लस एकमेव हत्यार आहे.