Viral : ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

Zomato CEO Reply : प्रत्येकाने नवीन वर्षाचं सेलिब्रेशन खास केलं. एका व्यक्तीने झोमॅटोवर तब्बल 125 रुमाली रोटी ऑर्डर केल्या. यावर Zomato CEO दिपेंद्र गोयल यांच उत्तर महत्त्वाचं... 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 2, 2024, 10:18 AM IST
Viral : ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया  title=

जगभरातील लोक नवीन वर्षाच स्वागत वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा क्षण साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी आहे. अशावेळी अनेकजण मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की, स्वादिष्ट पदार्थ, गाणी, आपल्या व्यक्तीसोबतचा वेळ असा एकंदर माहोल असतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पार्टी आणि त्यासाठी ऑर्डर केलेले रुमाली रोटी हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे झोमॅटोवरुन 20 किंवा 30 नाही तर 125 रुमाली रोट्या ऑर्डर केल्या आहेत. 

झोमॅटो सीईओ दिपेंद्र गोयल यांनी या सगळ्यावर एक्स (ट्विटर)वर याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलंय की, 'खरंच मला देखील कोलकातामधील ही पार्टी अटेंड करायची आहे. जिथे एका व्यक्तीने तब्बल 125 पदार्थ एका सिंगल ऑर्डरमध्ये मागवली आहे.' ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून आतापर्यंत 360K लोकांनी पाहिली आहे. एका युझर्सने उत्सुकतेपोटी विचारलं की, या ऑर्डरसाठी किती ड्रायव्हर पिकअप करायला लागले. फक्त 125 रुमाली रोटी असल्याचं गोयल यांनी सांगितलं. 

गोयल नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कंपनीच्या ऑर्डर्स आणि कामकाजाविषयी वारंवार अपडेट्स शेअर करत होते. ही वेळ अतिशय महत्त्वाची असून सगळ्यांना वेळेत जेवण पोहोचवणे हा एक टास्क आहे. त्याच्या इतर पोस्टपैकी एक पोस्टची देखील खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर ऑनलाइन प्रतिक्रियांची एक चैनच तयार झाली आहे. 31 डिसेंबर 2023 च्या संध्याकाळी, त्यांनी कंपनीची "वॉर रूम" दर्शविणारे काही फोटो पोस्ट केले. हे Zomato च्या ऑफिसमधील कॉन्फरन्स रूम असल्याचे दिसते आणि काही कर्मचारी टेबलाभोवती बसलेले दिसतात.

पोस्टला आतापर्यंत 590K पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. X युझर्सनी अनेक कारणांमुळे यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. खाली दिलेल्या काही पोस्ट पाहा.

सध्या सोशल मीडियावर या सगळ्या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रत्येकाने या निमित्ताने पुन्हा एकदा आपली नवीन वर्षाची पार्टी आणि तो काळ अनुभवला.