उकाड्यापासून वाचण्यासाठी वऱ्हाड्यांचा तोड जुगाड, एकदा व्हीडिओ पाहाच

एका वरातीत वऱ्हाड्यांनी उकाड्यापासून वाचण्यासाठी आणि विनादिक्कत रेटून नाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवली.

Updated: Apr 21, 2022, 11:03 PM IST
उकाड्यापासून वाचण्यासाठी वऱ्हाड्यांचा तोड जुगाड, एकदा व्हीडिओ पाहाच title=

मुंबई :  सध्या तापमानवाढीमुळे उकाड्याने हैराण व्हायला होतंय. सर्वत्र उष्णतेची लाट आहे. शरीराची लाहीलाही होतेय. या उकाड्याचा त्रास टाळण्यासाठी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने काही न काही मार्ग काढतो. मात्र एका वरातीत वऱ्हाड्यांनी उकाड्यापासून वाचण्यासाठी आणि विनादिक्कत रेटून नाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. वऱ्हाड्यांनी वरातीत डीजेसोबत चक्क कूलरचीही सोय केली आणि झिंगाट डान्स केला. या तोड जुगाडचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (fact check viral video in wedding cooler installed with dj at the show to escape the heat)

दरम्यान सध्या लग्नाचा सीझन आहे, त्यामुळे हा उपाय अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. हा व्हिडिओ मध्यप्रदेशच्या टीकमगडमधील असल्याचा दावा केला जातोय. या जुगाडू वरातीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.