मस्करीत मित्राला दगडावर लटकवलं, पण पुढे जे काही झालं... पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Shocking Viral Video : मित्रसोबत असल्यावर मस्करी तर आलीच, पण मस्करीत असं काही करू नका, ज्यामुळे तुमच्या जिवाला धोका होईल. सध्या एक थरारक व्हिडीओ (Viral video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

सौरभ तळेकर | Updated: Dec 1, 2023, 04:08 PM IST
मस्करीत मित्राला दगडावर लटकवलं, पण पुढे जे काही झालं... पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video title=

Friends masti video : फिरायला जाण्यासाठी अनेकजण ऑफिसमध्ये खोटं बोलून सुट्ट्या मारतात. तर काहीजण कॉलेज अर्धवट सोडून फिरण्याचा प्लॅन करतात. मित्रांसोबत मजा, मस्ती करण्याची मजाच वेगळी असते. ना कोणाची जबाबदारी ना कशाचं टेन्शन.. सगळ्यात विरंगुळ्याचं माध्यम म्हणजे मित्रांसह फिरणं... मित्रसोबत असल्यावर मजा आणि मस्ती आलीच. मात्र, मस्करीत असं काही करू नका, ज्यामुळे तुमच्या जिवाला धोका होईल. सध्या एक थरारक व्हिडीओ (Viral video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Friends masti video) व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक तरुण एका दगडाला लटकल्याचं पहायला मिळतंय. त्या तरुणाला वाचवण्यासाठी त्याचे मित्र प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. व्हिडीओमधील पहिले काही सेकंद तुमचा थरकाप उडवतील. मात्र, पुढच्या काही सेकंदात तुम्ही सिलॅक्स होऊन जाल. कारण हा सर्व प्रकार आहे, कॅमरामॅनच्या कलाकारीचा...

 पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Malik Tahleel (@malik_tahleel_17)

तीन मित्रांनी तरुणाला लटकवलं अन् चौथ्या मित्राने बरोबर अँगल पकडून फोटो आणि व्हिडीओ काढला. मात्र, तरुण काहीसा उंचीवर असल्याने त्याला भीती वाटत होती. पण मित्र असल्यावर चिंता कसली. बाकीच्या मित्रांना त्याला पायाला धरून खाली उतरवलं. मात्र, तरुणाचं वजन मित्रांना झेपलं नाही अन् तिन्ही मित्र खाली पडले. त्यावेळी बाकीच्या मित्रांना हसू अनावर झालं.

आणखी वाचा - रणबीरचं नाही तर, 'या' कलाकारांनी लग्नानंतरही दिलेत इंटिमेट सीन

दरम्यान, हा व्हिडिओ @adnan_babar_962 ने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 22 लाख 50 हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले असून 3 कोटींहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट केल्या असून, काही मित्रांनी आपल्या जवळच्या मित्रांना व्हिडीओ शेअर देखील केलाय.