Gold Price Today: गेल्या महिन्यात सोन्याने उच्चांकी दर गाठला होता. मात्र आता सोन्याचा दर घसरला आहे. पण महागाईच्या या काळात सोनं महाग असतानाही लोकांनी धडाधड सोनं खरेदी केले आहे. 19 एप्रिल रोजी सोन्याचा दर जीएसटीसह 758000 रुपये प्रती 10 ग्रॅमवर पोहोचले होते. मात्र, तरीही लोकांना सोनं खरेदी करण्याचा मोह आवरता आला नाही. जानेवारी ते मार्च दरम्यान दरवर्षी सोन्याची विक्री 8 टक्क्याने वाढून 136.6 टनवर पोहोचली आहे. यात लोकांनी 95.5 टन सोन्याचे दागिनेच खरेदी केले आहेत. त्या व्यतिरिक्त 41 टक्के सोन्याची नाणी आमि बिस्किट याची विक्री झाली आहे. ही माहिती जागतिक गोल्ड काउन्सिलकडून जारी करण्यात आली आहे.
दुसरीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून खरेदी करण्यात आलेल्या सोन्याची मागणीतही वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारी- मार्चमध्ये किंमतीच्या हिशोबाने देशात सोन्याची मागणी दरवर्षी 20 टक्के वाढून 75,470 कोटी रुपये इतकी झाली आहे. याचे कारण म्हणजे मागणीत वाढ आणि तिमाही सरासरी किमतीत झालेली 11 टक्के वाढ हे आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) ने आपला जागतिक अहवाल 'गोल्ड डिमांड ट्रेंड Q1 2024' जारी केला. त्याननुसार, भारतात सोन्याची एकूण मागणी ज्यात गुंतवणूक आणि दागिने दोघांचा समावेश आहे. त्यानुसार, दरवर्षी जानेवारी-मार्चमध्ये वाढून 136.6 टन इतकी झाली आहे. जे एक वर्ष आधी 126.3 टन इतकी होती.
भारतात सोन्याची एकूण मागणीपैकी दागिन्यांची मागणी 4 टक्क्यांनी वाढून 95.5 टन झाली आहे. एकूण गुंतवणुकीची मागणी (बार, नाणी इ.) 19 टक्क्यांनी वाढून 41.1 टन झाली आहे. सोन्याच्या मागणीत झालेली वाढ ही भारतीयांचे सोन्यासंबंधी असलेला जिव्हाळा याची पुन्हा एकदा प्रचिती येते. मार्चमध्ये किंमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला असला तरी भारताचे मजबूत आर्थिक वातावरण सोने खरेदीसाठी पोषक राहिले आहे. तिमाहीअखेरीस फक्त विक्री कमी झाली आहे. यावर्षी भारतात सोन्याची मागणी सुमारे 700-800 टन असेल, अशी माहिती भारतातील डब्ल्यूजीसीचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी म्हटलं आहे.