आज या शेअरने घेतली तुफान उसळी; दिग्गज गुंतवणूकदारांचाही खरेदीचा सल्ला, जाणून घ्या टार्गेट

शेअर बाजाराने यावर्षी मोठी तेजी नोंदवली आहे. याच क्रमात खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक असेलेल्या ICICI Bankच्या शेअर्समध्ये आज जोरदार तेजी दिसून आली आहे. 

Updated: Oct 25, 2021, 02:08 PM IST
आज या शेअरने घेतली तुफान उसळी; दिग्गज गुंतवणूकदारांचाही खरेदीचा सल्ला, जाणून घ्या टार्गेट title=

मुंबई : शेअर बाजाराने यावर्षी मोठी तेजी नोंदवली आहे. याच क्रमात खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक असेलेल्या ICICI Bankच्या शेअर्समध्ये आज जोरदार तेजी दिसून आली आहे. आयसीआयसीआय बँकेचे शेअर इंट्राडेमध्ये 8 टक्क्यांहून अधिक मजबूत होऊन 824 रुपयांवर पोहचले आहेत. 

बँकेच्या शेअर्समध्ये 100 टक्क्यांहून जास्त तेजी
या एका वर्षात आयसीआयसीआयच्या बँकेच्या शेअर्समध्ये 100 टक्क्यांहून जास्तची तेजी नोंदवली गेली आहे. शनिवारी बँकेने सप्टेंबर तिमाहीचे आपले निकाल जारी केले. शनिवारी तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी आयसीआयसीआयच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून आली. ब्रोकरेज हाऊसने या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज हाऊस देत आहेत गुंतवणूकीचा सल्ला 
ब्रोकरेज हाऊस क्रेडिट सूईसने आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये आऊटपरफॉर्म रेटिंग दिली आहे. आणि नवीन टार्गेट 900 रुपये दिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, बँकेची कोर प्राफिटॅबिलीटी वाढली आहे. आणि यापुढे क्रेडिट कास्टसुद्धा नॉर्मलाइज होण्याची शक्यता आहे. 

या ब्रोकरेज हाऊसचा 1100 रुपयांचे टार्गेट
दुसरीकडे ब्रोकरेज हाऊस CLSA ने सुद्धा आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 1100 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. बँकिंग सेक्टरमध्ये  ICICI Bankची सलग ग्रोथ दिसून येत आहे. बँकेची एसेट क्वॉलिटीदेखील तिमाही दर तिमाहीमध्ये सुधारणा होत आहे. 

मोतिलाल ओस्वालचा टॉप पिक 
ब्रोकरेज हाऊस मोतिलाल ओस्वालने आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला देत 1000 रुपयांचे टार्गेट दिले आहे. 

बँकेचे निकाल
आयसीआयसीआय बँकेच्या निकालांमध्ये बँकेच्या नफ्यात 25 टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. तसेच स्टॅडर्डलोन बेसवर बँकेचा नेट प्रॉफिट 30 टक्क्यांनी वाढून 5511 कोटी रुपये झाला आहे