मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 9 ते 23 ऑगस्टदरम्यान अनेक ट्रेन रद्द

Centarl Railway News : रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येतो. पण, आता मात्र काही रेल्वे गाड्या रद्द घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 10, 2023, 09:17 AM IST
मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 9 ते 23 ऑगस्टदरम्यान अनेक ट्रेन रद्द  title=
indian railway Central Railway Canceled 19 Trains On Between August 9 to 23 aug

Indian Railway News : रेल्वे विभागकातर्फे सातत्यानं करण्यात येणाऱ्या बदलांचा प्रवाशांवर थेट परिणाम होताना दिसतो. असाच एक निर्णय येत्या काळात प्रवाशांच्या प्रवासवेळा किंबहुना प्रवासाचे दिवस वाढवण्याची शक्यता आहे. कारण काही महत्त्वाच्या कामांसाठी भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाकडून काही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

मुंबई-हावडा मध्य रेल्वेचा चौथा मार्ग आता सक्ती रेल्वे स्थानकाशी जोडण्यासोबत स्थानकाच्या यार्डाचच काम असल्यामुळं इथून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूक थांबवण्यात येणार आहे. परिणामी 9 ते 23 ऑगस्टदरम्यानच्या काळात विविध तारखांना तब्बल 19 रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळं प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

कोणत्या रेल्वे रद्द? 

अकोला मार्गे जाणाऱ्या....

20822 संत्रागाछी- पुणे एक्स्प्रेस (12 ऑगस्ट)
20821 पुणे- संत्रागाछी एक्स्प्रेस (14 ऑगस्ट)
12880 भुवनेश्वर- कुर्ला एक्स्प्रेस (14 ऑगस्ट)
12789 कुर्ला- भुवनेश्वर एक्स्प्रेस (16 ऑगस्ट)

नेमकं कोणत्या ठिकाणी हाती घेण्यात येईल हे काम? 

हावडा- मुंबई मार्हावर सक्ती नावाचं रेल्वे स्थानक येतं. इथंच नागपूरपासून बिलासपूर आणि झारसुगुडा येथे चौथा रेल्वेट्रॅक टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. कामाचा काही टप्पा पूर्ण झाला असून, तिथली वातूकही सुरु झाली आहे. पण, उर्वरित काम पूर्ण होईपर्यंत मात्र प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात सक्ती रेल्वे स्थानकाऐवजी जेठा पॅसेंजर येथे रेल्वे थांबवण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

हेसुद्धा पाहा : Video : अन् नदीचा प्रवाह अचानक वाढला; हिमाचलमधील ढगफुटीनंतर निसर्गानं घाबरवलं 

रद्द करण्यात आलेल्या उर्वरित रेल्वेगाड्या खालीलप्रमाणे... 

08736 बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल (9 ते 22 ऑगस्ट)
18113 टाटानगर – बिलासपूर एक्सप्रेस (9 ते 21 ऑगस्ट)
18109 टाटानगर – इतवारी एक्सप्रेस (9 ते 21 ऑगस्ट)
18110 इतवारी – टाटानगर – एक्सप्रेस (9 ते 21 ऑगस्ट)
08738 बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल (10 ते 22 ऑगस्ट)
08737 रायगड-बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल (10 ते 22 ऑगस्ट)
08735 रायगड – बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल (10 ते 23 ऑगस्ट)
18114 बिलासपूर-टाटानगर एक्सप्रेस (10 ते 22 ऑगस्ट)
20827 जबलपूर-संत्रागाछी एक्सप्रेस (10 ऑगस्ट)
22843 बिलासपूर-पाटणा एक्सप्रेस (11 ऑगस्ट)
17006 रक्सौल-हैदराबाद एक्सप्रेस (13 ऑगस्ट)
22844 पाटणा-बिलासपूर एक्सप्रेस (13 ऑगस्ट)