रेल्वेच्या Waiting List तिकिटांचेही अनेक प्रकार, पाहा कोणतं तिकीट हमखास Confirm होतं

Indian Railway Ticket News : रेल्वे प्रवास करताना बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणं अपेक्षित असतं. त्यातही मुद्दा तिकिटाचा येतो तेव्हा सतर्कताच जास्त गरजेची असते.   

सायली पाटील | Updated: Aug 24, 2023, 12:27 PM IST
रेल्वेच्या Waiting List तिकिटांचेही अनेक प्रकार, पाहा कोणतं तिकीट हमखास Confirm होतं  title=
Indian Railway Types Of Waiting List Tickets And Which One Has The Highest Chances of confirmation

Indian Railway Ticket News : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकालाच या प्रवासातील अनेक बारकावे ठाऊक असतात. पण, जेव्हा एखादा नवखा प्रवासी या रेल्वे मार्गानं प्रवास करतो तेव्हा मात्र त्याची चांगलीच तारांबळ उडते. कारण, यामध्ये असे अनेक खाचखळगे असतात ज्याविषयी माहिती नसल्याच तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं किंवा मग प्रवासच रद्द होऊ शकतो. 

रेल्वे प्रवासाचा असाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे वेटिंग तिकीट आणि त्याचं कन्फर्मेशन. बऱ्याचदा प्रवासी Waiting Ticket मध्ये असे काही गोंधळतात की विचारून सोय नाही. त्यामुळं तुम्ही ही वेटिंग लिस्टच्या तिकिटांबद्दलची माहिती व्यवस्थित वाचा आणि इतरांपर्यंतही पोहोचवा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, वेटिंग लिस्टमधील तिकिटांचे प्रकार. यामध्ये हे प्रकारही तितकेच महत्त्वाचे कारण, त्यातील काही तिकिटं अगदी हमखास कन्फर्मही होतात. 

रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट (RLWL)

जेव्हा तुम्ही मूळ आणि अंतिम स्थानकादरम्यानच्या एखाद्या स्थानकासाठी तिकीट बुक करता तेव्हा तिथं RLWL लागू होते. या प्रकारातील आसनांची संख्याही कमी आहे. त्यामुळं तुम्ही तिकीट काढलेल्या स्थानकावरील प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यासच तुमचं तिकीट Confirm होऊ शकतं. 

सामान्य वेटिंग लिस्ट (GNWL)

ही सर्वसामान्य वेटींग लिस्ट आहे. जनरल प्रवर्गातून आरक्षण करणारे प्रवासी या प्रकारात मोडतात. या तिकिटावरील कन्फर्मेशन तिकीट काढतानाची वेळ, रेल्वेची मागणी अशा घटकांवर अवलंबून असतं. 

आरएसी (Reservation Against Cancellation)

आरएसीमुळं प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करण्याची आणि प्रवास रद्द झाल्यास त्या तिकिटावर दुसऱ्या प्रवाशाला प्रसावासाची परवानगी मिळते. इथं पूर्ण बर्थच्या कन्फर्मेशनची हमी मात्र देता येत नाही. 

हेसुद्धा वाचा : Asia Cup 2023 आधी भारतीय क्रिकेटपटूंची अग्निपरीक्षा; विराट- रोहितलाही विशेष सवलत नाहीच 

पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट (PQWL)

यी वेटिंग लिस्ट मध्यवर्ती स्थानकांसाठी लागू होते. PQWL मध्ये सहसा GNWL आणि RLWL च्या तुलनेत तिकीट कमीच Confirm होतात. कारण हा अनेक स्थानकांमध्ये विभागलेला राखीव कोटा असतो. 

तत्काल वेटिंग लिस्ट

तत्काल वेटिंग लिस्टमध्ये तिकीट काढताना तुम्हाला तिकीटाचे पूर्ण पैसे भरूनही तातडीनं कन्फर्म तिकीट मिळणार नाही. पण, इथं तुमचं तिकीट Confirm होण्याची शक्यता मात्र जास्त असते. 

तिकीट Confirm कसं होतं? 

रेल्वे निघण्यापूर्वी कॅन्सलेशनची संख्या थेट वेटिंग लिस्टच्या शक्यतांवर अर्थात कन्फर्मेशनवर प्रभाव टाकते. वारंवार मोठ्या प्रमाणात तिकीं रद्द होत असणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये सहज तिकीट कन्फर्म होतं. पण, काही महिन्यांसाठी मात्र या शक्यता धुसरच असतात कारण, त्यादरम्यान रेल्वे तिकीटांची मागणीच जास्त असते. काही विभागांमध्ये असणाऱ्या आरक्षित आसनांच्या बाबतीत कन्फर्मेशनची दाट शक्यता असते. त्यामुळं इथून पुढं लांब पल्ल्याच्या रेल्वेप्रवासादरम्यान तिकीट काढताना या गोष्टींवरही लक्ष द्या.