भारताचं सडेतोड उत्तर, पाकिस्तानचे ३ ते ४ सैनिक ठार

 मागील ३ दिवसांपासून पाकिस्तानकडून फायरिंग

Updated: May 8, 2020, 04:40 PM IST
भारताचं सडेतोड उत्तर, पाकिस्तानचे ३ ते ४ सैनिक ठार title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir)च्या पुंछ सेक्टरमध्ये मागील ३ दिवसांपासून पाकिस्तानकडून फायरिंग होत आहे. भारतीय जवान देखील त्यांना सडेतोड उत्तर देत आहे. भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्यूत्तरात पाकिस्तानचे ३ ते ४ सैनिक मारले गेल्याची माहिती मिळते आहे. तर ५ सैनिक जखमी झाले आहेत. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या ४ चौक्या देखील उद्धवस्त केल्या आहेत.

कोरोनाच्या संकटात देखील पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. आपल्या नापाक हरकती त्याने सुरुच ठेवल्या आहेत. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे. भारतीय जवान देखील त्याला उत्तर देत आहेत.

मागील महिन्यात कुपवाडामध्ये झालेल्या फायरिंगमध्ये ३ नागरिकांचा मृत्यू झाला होता.  भी कुपवाड़ा जिले के रंगवार क्षेत्र में पाकिस्तानी फायरिंग में तीन नागरिकों की मौत हो गई थी. त्याआधी पुंछ आणि कठुआ जिल्ह्यातील एलओसीवर देखील पाकिस्तानकडून गोळीबार झाला होता. ज्यामध्ये एक महिला जखमी झाली होती.