जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात; ट्रकवर वीज कोसळल्याने चार जवान शहीद झाल्याची शक्यता

Jammu Kashmir Army Truck Fire: वीज कोसळ्यानंतर लगेचच संपूर्ण ट्रकने पेट घेतला होता. मात्र पाऊस सुरु असतानाही ट्रकला लागलेली आग आटोक्यात आली नाही. याच आगीत तीन ते चार जवान जळाल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: Apr 20, 2023, 06:56 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात; ट्रकवर वीज कोसळल्याने चार जवान शहीद झाल्याची शक्यता title=

Sky Lightening on Indian Army Truck : जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पुंछमध्ये (Poonch) गुरुवारी एक मोठा अपघात घडला आहे. वीज पडल्याने (Sky Lightning) राष्ट्रीय महामार्गावर भारतीय लष्कराच्या (Indian Army) ट्रकने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत 3-4 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू-पुंछ महामार्गावरील भाटाटूडियां परिसरातून जात असताना भारतीय लष्कराच्या ट्रकवर वीज कोसळली. सुत्रांच्या वृत्तानुसार या ट्रकमध्ये 10 ते 12 सैनिक प्रवास करत होते. ट्रकवर वीज पडल्यानंतर ट्रकने पेट घेतला आणि त्यात बसलेल्या जवानांचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह जम्मू काश्मिर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या या ट्रकमध्ये शस्त्रांशिवाय डिझेलही होते, त्यामुळे आग आणखी भडकली. हा अपघात झाला त्यावेळी परिसरात पाऊस सुरू होता, मात्र तरीही ट्रकची आग आटोक्यात येऊ शकली नाही आणि काही जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून वीज कोसळ्यानंतर संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे.