Weird Tradition : भारतात 'या' ठिकाणी महिलेचे असतात एकाहून अनेक पती; प्रत्येकासोबत रात्र घालवण्यासाठी...

Weird Tribes : ऐकावं ते नवलंच! भारतात आजही या गावात महिलेचे एकाहून अनेक पती असता. या प्रथेला द्रौपदी प्रथा अशं म्हटलं जातं. काय हे नेमकी प्रथा जाणून घेऊयात. 

नेहा चौधरी | Updated: Nov 22, 2023, 12:44 PM IST
Weird Tradition : भारतात 'या' ठिकाणी महिलेचे असतात एकाहून अनेक पती; प्रत्येकासोबत रात्र घालवण्यासाठी... title=
One woman has several husbands in Indian village wife spend the night with 7 husbands Draupadi Tradition at Kinnaur Himachal Weird Tradition

Weird Tribes : पांचाल राजा द्रुपदची कन्या द्रौपदीच्या विवाहासाठी स्वयंवर ठेवण्यात आला होता. त्यावेळी अर्जुनने धनुर्विद्याने द्रौपदीला मिळवलं. त्यानंतर अर्जुन भावंडासह द्रौपदीला घेऊन घरी आला. त्यावेळी त्यांनी आईला हाक मारली पण माता कुंती कामात व्यस्त होती. मुलांनी काय आणलं याकडे तिने पाहिलं नाही. त्यावर ती म्हणाली की, जे काही सोबत आणलं आहे, ते पाच भावंडामध्ये वाटू घ्या. त्यामुळे द्रौपदीला पाच भावांची पत्नी म्हणून जीवन जगावं लागलं. पण ही झाली प्राचीन काळातील महाभारतातील कथा. पण भारताच्या या गावात आजही एका महिलेचे अनेक भावांशी लग्न लावलं जातं. या परंपरेला ते द्रौपदी प्रथा म्हणून ओळखलं जातं. इथे एका महिलेचे पाच तर कोणाचे सात नवरे आहेत. विशेष म्हणजे एका बायकोसोबत पाच किंवा सात भावंड एकत्र नांदतात. (One woman has several husbands in Indian village wife spend the night with 7 husbands Draupadi Tradition at Kinnaur Himachal Weird Tradition video )

'या' प्रथेमागील कारण काय?

भारतातील या गावात ही परंपरा महाभारत काळापासून आजही पळली जात आहे. या गावातील लोकांची असं मान्यता आहे की, पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा ते या गावात काही काळासाठी राहिले होते. त्यामुळे ही प्रथा आजही पाळली जाते. या प्रथेमुळे वैवाहिक जीवन सुखी राहतं अशी त्यांची मान्यता आहे. 

 'ती' टोपी असते त्या गोष्टीचं संकेत

आता पाच किंवा सात नवरे असलेल्या बायकोला प्रत्येकासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतात. त्यासाठीही एक अनोखी प्रथा पाळली जाते. जेव्हा या भावंडांपैकी कोणाला पत्नीसोबत एकांतात वेळ घालवायचा असेल तर ते खोलीच्या दाराबाहेर टोपी ठेवतात. टोपीचा हा संकेत म्हणजे त्या खोलीत महिलेच्या इतर पतीला जाण्यास बंदी असते. 

सुखी संसारामागील रहस्य!

या घरातील पाच पतीसोबत राहणाऱ्या एकुलत्या एक पत्नीनी सोबत सुखी संसार जगता यावं यासाठी काही नियम आखलेले असतात. त्यानुसार घरातील मालमत्तेची कधीही भावंडांमध्ये विभागणी होत नाही. तर त्या महिलेला मुलं झालं असेल तर ते मुलं हे बायोलॉजिकल फादरला बाबा म्हणून हाक मारतो. तर इतरांना तो मोठा बाबा किंवा धाकटा बाबा असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्या महिलेच्या एखाद्या पतीचं निधन होतं. तेव्हा तिला विधवेचं आयुष्य जगावं लागत नाही. तिला त्या व्यक्तीच्या जाण्याने दु:ख होतं पण इतर नवरे असल्याने तिला संरक्षण मिळतं. 

DraupadiTradition

कोणाच्या हातात असतात घराची सूत्र?

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या संसाराचे आणि त्या घराची सूत्र ही होम मिनिस्टर बायकोच्या हातात असतात. असे विवाह करणाऱ्या महिलेला या गावात गोयने आणि तिच्या पतीला गोरियस असं म्हटलं जातं. 

कुठे आहे ही विचित्र प्रथा?

ही धक्कादायक आणि विचित्र प्रथा भारतातील हिमाचल प्रदेशात पाळली जाते. हिमाचल प्रदेशातील किन्नौर गावात (Draupadi Tradition in Kinnaur Himachal)  आजही असे लग्न लावले जाता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या समाजाने या परंपेराला मान्यतादेखील दिली आहे.