'...तर मी संन्यास घेईल', बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी, स्पष्टच म्हणाले...

Bihar Politics : नितीश कुमार धूर्त आहेत. त्यांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केलीये. बिहारचे लोक व्याजासह त्यांचा हिशोब करतील, असं प्रशांत किशोर (Prashant Kishor On Nitish Kumar) म्हणाले आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Jan 28, 2024, 06:37 PM IST
'...तर मी संन्यास घेईल', बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी, स्पष्टच म्हणाले... title=
Prashant Kishore,Nitish Kumar,Bihar Politics

Prashant Kishor On Nitish Kumar : गेल्या तीन दिवसांपासून बिहारमध्ये (Bihar Politics) चालू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी 9 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित शपथविधी सोहळा पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून आघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् भाजपसोबत युती केली आहे. गेल्या 10 वर्षांत पाच वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ नितीश कुमार यांनी घेतल्याने बिहारमध्ये चर्चांना उधाण आलंय. अशातच आता प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Prashant Kishor काय म्हणाले?

नितीश कुमार धूर्त आहेत. त्यांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केलीये. बिहारचे लोक व्याजासह त्यांचा हिशोब करतील. लोकसभा निवडणूक सोडा, आम्ही तुम्हाला मागे फिरायला सांगितलं नव्हतंय. नितीश कुमार कोणत्याही आघाडीतून लढले तरी पुढील विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाला 20 जागाही मिळणार नाहीत. ते आले तर मी माझ्या कामातून निवृत्त होईन, असं प्रशांत किशोर (Prashant Kishor On Nitish Kumar) म्हणाले आहेत. 

नितीश कुमार काय म्हणाले?

मागील विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या लोकांकडून मिळालेल्या मतांनुसार, मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. आम्ही पूर्वीची आघाडी (एनडीए) सोडून नवीन आघाडी केली होती, मात्र त्यात परिस्थिती योग्य वाटत नाही आमच्या लोकांना त्रास होत होता. ते मेहनत घेत होते. परंतु, काही गोष्टींचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोहोचलो, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी थेट नाराजी देखील व्यक्त केलीये.

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी याआधी देखील नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला होता. नितीश कुमार भारत आघाडीसोबत निवडणूक लढले तर लोकसभा निवडणुकीत त्यांना पाचही जागा मिळणार नाहीत. पाचपेक्षा जास्त जागा मिळाल्यास ते जाहीर माफी मागतील, असं प्रशांत किशोर म्हणाले होते. त्यामुळे आता प्रशांत किशोर जेडीयूविरुद्ध मोर्चा खोलणार का? असा सवाल विचारला जातोय.