AC Tips : उन्हाळ्यात एसीचं टेम्परेचर किती असावं, ज्यामुळे 99% बिल येतं कमी

Best AC Temperature for Sleeping: उन्हाळ्याच्या हंगामात, कडक ऊन आणि उष्णतेमुळे लोक घरांमध्ये एसीमध्येच राहणे पसंत करतात. पण एसीचं टेम्परेचर किती असावं ज्यामुळे बिल देखील आटोक्यात येतं. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 19, 2024, 12:45 PM IST
AC Tips : उन्हाळ्यात एसीचं टेम्परेचर किती असावं, ज्यामुळे 99% बिल येतं कमी  title=

कडाक्याच्या उन्हात चांगली झोप येण्यासाठी लोक घरात एअर कंडिशनर लावतात, पण काही लोकांना एसीचे तापमान कसे ठेवायचे ते समजत नाही जेणेकरून त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये. एसी चालवताना हवामानानुसार शरीराला थंडावा मिळतो पण अनेकदा याचा परिणाम विजेच्या बिलावर होताना दिसतो. रात्री गाढ झोप येण्यासाठी खोलीचे तापमान योग्य असावे. एसीचे तापमान कमी ठेवल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. रात्री चांगली झोप येण्यासाठी एसीचे तापमान किती असावे?

एसीचे तापमान किती असावे

  • 15 वर्षांखालील मुलांच्या खोलीतील एसीचे तापमान 21अंश सेल्सिअस ठेवल्यास त्यांना शांत झोप लागेल.
  • मुलांना खूप उष्णतेबरोबरच थंडीही वाटते, अशा परिस्थितीत मुलांच्या खोलीचे तापमान २१ अंश असेल तर त्यांना शांत झोप लागेल.
  • प्रौढांसाठी, खोलीतील एसीचे आदर्श तापमान 20 अंश सेल्सिअस असावे. या तापमानात झोप चांगली लागते, एसीचे तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवल्यास अति थंडीमुळे प्रकृती बिघडण्याचा धोका असतो.
  • वृद्धांसाठी, खोलीतील एसीचे आदर्श तापमान 24 अंश सेल्सिअस असते. वृद्धांना खूप थंडी वाटते, त्यामुळे त्यांच्या खोलीचे तापमान 24 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास त्यांची प्रकृती बिघडू शकते.
  • एसी चालवताना लक्षात ठेवा की त्यात टायमर लावणे आवश्यक आहे. सकाळी अति थंडीमुळे आरोग्यही बिघडू शकते.
  • एसीमुळे सकाळपर्यंत खोली खूप थंड होते, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या एसीचे तापमान खोलीनुसार सेट केल्यानंतरच झोपावे.

विजेचं बील कमी येण्यास किती टेम्परेचर असावं? 

एसीची टेम्परेचर 24 पर्यंत असल्यास तापमान थंड राहतं. सोबतच विजेचं बिल देखील कमी येण्यास मदत होते. 90% हून अधिक लोकांना याबाबत माहितीच नसते. उर्जा मंत्रालयाच्या अंदाजानुसार, ही मोहीम यशस्वी झाल्यास एका वर्षात 20 अब्ज युनिट विजेची बचत होऊ शकते. आरोग्यही चांगले राहील आणि विजेचे बिलही कमी होईल. वैयक्तिकरित्या सांगायचे तर, 24 डिग्री तापमानात एसी चालवल्यास तुमच्या घराच्या वीज बिलात 15 ते 20 टक्के बचत होऊ शकते.