अस्सल मराठी मातीतील मुला-मुलींची गोड नावे आणि अर्थ

Baby Names on Marathi Bhasha : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज महाराष्ट्रातील अस्सल मराठी मुलांची नावे जाणून घेणार आहोत. ज्यामुळे कायम जपली जाईल मातृभाषा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 27, 2024, 12:18 PM IST
अस्सल मराठी मातीतील मुला-मुलींची गोड नावे आणि अर्थ  title=

मराठी साहित्याचा मानदंड 'वि.वा.शिरवाडकर'यांचा आज जन्मदिवस 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा केला जातो. विष्णू वामन शिरवाडकर हे एक आधुनिक मराठी कवी नाटककार आणि कांदबरीकार होते. वि.वा. शिरवाडकर हे कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन करतं. कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे जिल्ह्यात झाला. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील शिरवाडे हे गाव त्यांचे जन्मगाव म्हणून ओळखले जाते. 

'मराठी भाषा गौरव दिन'हा दिवस आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून साजरा करण्यात येतो. 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारनं घेतला.तेव्हापासून 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. 

 

आज 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त मराठी भाषेतील अतिशय क्यूट आणि सुंदर नावे मुलांसाठी ठेवू शकता. ज्यामुळे मुलांच्या नावातील वेगळेपणही जपून राहिल.तसेच मराठी भाषा देखील मुलांवर खास संस्कार करेल यात शंका नाही. मराठीतील ही अशी नावे आहेत. ज्यामध्ये मराठी भाषेतील गोडवा देखील दडलेला आहे. 

मुलांची मराठीतील क्यूट नावे आणि अर्थ

अथांग - शेवट नसलेला, विस्तीर्ण, थांग नसलेला, विशाल, मोठा 

मैत्रेयी - मैत्री योग्य अशी स्त्री 

लौकिक - सद्गुणांची वाहवा, चांगल्या चारित्र्याबद्दल चर्चा 

सूर्यद - सूर्याचे एक अनोखे नाव

स्वराली - गोड आवाज, आनंदी व्यक्तिमत्त्व, एक अनोखी चमक असा या नावाचा अर्थ आहे. 

(हे पण वाचा - 2024 मध्ये अतिशय चर्चेत आहेत मुलांची 'ही' Unique Names, जाणून घ्या अर्थ)

 

मलय - म्हैसूरजवळ चंदनाच्या झाडाचा डोंगर, सुगंधी व्यक्तिमत्त्व, 

धवल - या नावाचा अर्थ आहे सुंदर, सफेद आणि परिकथेतील राजकुमार

गिरिजा - देवी पार्वती, भगवान शंकराची पत्नी, डोंगरातून जन्मलेली असा या नावाचा अर्थ आहे. 

अभिराम - आल्हाददायक; सुखकारक असा या नावाचा अर्थ आहे. 

(हे पण वाचा - महाराजांवर नितांत दृढभाव असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी मुलांना दिलीत 'ही' खास नावं, ज्याचा संबध थेट शिवरायांशी)

निनाद - आवाज; पाण्याचा सौम्य आवाज असा या नावाचा अर्थ आहे. 

जुई - एक अतिशय गोंडस फूल मुलीसाठी हे नाव अतिशय खास आहे.