बालमृत्यूंनंतर नाशिक पालिका वृक्ष प्राधिकरण समितीला जाग

187 बालमृत्यूंनंतर नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला जाग आली आहे.

Updated: Sep 14, 2017, 11:07 PM IST
बालमृत्यूंनंतर नाशिक पालिका वृक्ष प्राधिकरण समितीला जाग title=

नाशिक : 187 बालमृत्यूंनंतर नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला जाग आली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या आवारातल्या 27 वृक्षांच्या तोडीला नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनं मंजुरी दिली आहे. 

मात्र या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात १० झाडं लावण्याची अट उच्च न्यायालयानं घालून दिली आहे. त्या अटीचं पालन करणारा अहवालही उच्च न्यायालयाला सादर केला जाणार आहे.