धक्कादायक! प्रेतांशी बोलण्याचा अघोरी प्रकार, शहर हादरले : VIDEO

वडील आणि भावाच्या आत्म्यांना जागृत करण्यासाठी स्मशानात घातली पूजा

Updated: Jul 12, 2021, 09:41 AM IST
धक्कादायक! प्रेतांशी बोलण्याचा अघोरी प्रकार, शहर हादरले : VIDEO  title=

जयेश जगड, झी मीडिया, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे प्रेतांशी बोलण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर मलकापूर शहर हादरले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा अंधविश्वासाचा एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे उघडकीस आला आहे. (Black Magic in Cementery to awaken the souls of father and brother Buldhana ) मृतक वडील आणि भावाच्या आत्मशांतीसाठी एकाने चक्क स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात तीन मांत्रिकाच्या उपस्थितीत दिव्यांची आरास मांडून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी एका व्यक्तीसह ३ मांत्रिकाने ताब्यात घेतलं आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातिल मलकापूर शहरातील ही घटना. माता महाकाली परिसरातील रहिवाशी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे आणि भावाचे निधन काही महिन्यापूर्वी झाले होते. त्यांची आत्मशांती झाली नाही, म्हणून त्याच्या घरात शांतता भंग झाली असल्याचा त्यांना समज झाला.  त्यावर उपाययोजना म्हणून आशीष गोठी याने शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास तीन मांत्रिक स्मशानभूमीत पाचारण केले. त्यांच्या उपस्थितीत चक्क दिव्यांची आरास मांडली , तसेच मंत्रोपच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार केला आहे.

या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. या प्रकारामुळे नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात एकच गर्दी केली होती. मात्र या प्रकाराने संपूर्ण परिसर चांगलाच हादरल आहे. असंख्य नागरिकांनी हा प्रकार बघीतला , मात्र भितीपोटी कुणी पुढे जाण्यासाठी तयार नव्हता. दरम्यान या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली आणि  पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आशिष गोठी सह तीन मांत्रिकांना ताब्यात घेतले ..

दरम्यान सार्वजनिक शांतता भंग केल्याने मलकापूर शहर पोलीसांनी आशिष गोठी याच्याविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर अघोरी कृत्य करणाऱ्या तिन्ही मांत्रिकांवर सुद्धा सार्वजनिक शांतता भंग केल्याने शहरपोलीसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या प्रकरणच अधिक तपास आता मलकापूर पोलीस करत आहे.