IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळा

IT Raid in Nanded : आयकर विभागानं  (Income tax department) नांदेडमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी धाड टाकली; त्यानंतर समोर आलेला एकूण ऐवज आणि त्याची रक्कम सर्वांना अवाक् करून गेली.   

Updated: May 15, 2024, 08:25 AM IST
IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळा  title=
it raid in nanded assets worth rupees 170 crores seized

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : (IT Raid in Nanded) लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीमध्ये असंख्य आर्थिक व्यवहारांवर यंत्रणाल लक्ष ठेवत असून, संशयास्पद हालचाली आणि कृत्य रोखण्याचं कामही करताना दिसत आहेत. वेळप्रसंगी काही ठिकाणी धाडीही टाकल्या जात आहेत. या अशा वातावरणात नांदेडमधील एका घटनेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या, कारण एका व्याराऱ्यावर टाकलेल्या धाडीमध्ये आयकर विभागाच्या हाती घबाड लागलं आहे. 

नांदेडमध्ये आयकर विभागानं धडक कारवाई करत एका व्यापाऱ्याकजडे असणारी कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. सदर धाडीमध्ये आतापर्यंत जवळपास 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये तब्बल 8 किलो सोनं आणि 14 कोटी रुपयांची रोकड आहे. नांदेडमधील भंडारी फायनान्स नावाच्या कंपनीवर 10 मे रोजी सकाळी आयकर विभागाने धाड टाकली होता. भंडारी फायनान्सच्या तीन कार्यालयांसह, एक गोल्ड लोनचं कार्यालय आणि भंडारी बंधूंच्या घरावर एकाच वेळी आयकर विभागाने धाड टाकली होता. 

यंत्रणेकडून टाकण्यात आलेल्या या धाडीमध्ये पुणे, नाशिक, छ्त्रपती संभाजी नगरमधील आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या धाडीसाठी जवळपास 25 ते 30 वाहनांतून साधारण 60 ते 70 अधिकारी नांदेडमध्ये दाखल झाले होते. सलग तीन दिवस झाडाझडती घेतल्यानंतर आयकर विभागानं ही धाड टाकली आणि त्यांच्या हाती जे लागलं ते पाहून अनेकांच्या पायाखालजी जमीन सरकली. 

हेसुद्धा वाचा : Modi In Mumbai: आज मुंबईच्या रस्त्यांवर 8 तासांचा 'मेगाब्लॉक'! घराबाहेर पडण्याआधी हे वाचाच

 

या धाडसत्रामध्ये आयकर विभागाला भंडारी कुटुंबाकडे जवळपास 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली. पुढे मंगळवारी भंडारी कुटुंबाच्या बँकेतील लॉकरची तपासणी करण्यात आली. जिथं सोन्याची बिस्किटं आणि इतर दागिने असं एकूण 8 किलो सोनं सापडले. तर एकूण 14 कोटी रुपयांची रोकडही सापडल्याची माहिती समोर आली. 

प्राथमिक माहितीनुसार आयकर विभागानं नांदेडमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्वरुपात धाड टाकण्याची कारवाई पार पाडली. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस ही कारवाई सुरुच होती. तब्बल 72 तास चाललेल्या या कारवाईतून जप्त करण्यात आलेल्या एकूण संपत्तीच्या मोजणीनंतर आता यंत्रणा त्याचा स्त्रोत आणि तत्सम पुढील तपास करताना दिसत आहेत.