Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊस

राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 14, 2024, 06:48 AM IST
Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊस  title=

राज्यात अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह अनेक भागात वादळी वारा, वीजांचा कडकडाट, गारपीटीसह पाऊस असं हवामान होतं. त्यामुळे विदर्भ जिल्ह्यातील काही भागाल यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

यलो अलर्ट या जिल्ह्यात जारी 

IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच पावसाची शक्यता सांगितली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

15 एप्रिल नंतर राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता कमी आहे. तसेच पुणे व परिसरात 14 एप्रिलपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील व 15 एप्रिलला आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात शुक्रवारी तापमान 38 डिग्री सेल्सिअस होते. महत्त्वाचं म्हणजे दिवसा हवामान ढगाळ असल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.

हवामानात का झाले बदल 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामान झालेल्या या बदलाचे कारण आहे इराण आणि पाकिस्तानातून भारतातील उत्तर भागात येणारा वेस्टर्न डिस्टर्बंस आहे. याचमुळे फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिल महिन्यात देशातील अनेक ठिकाणी वातावरणात बदल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.

हवामान खात्याने म्हटले आहे की, शनिवारी गंगेच्या पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार, राजस्थानमध्ये गडगडाट, धुळीचे वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. दरम्यान, काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. या काळात राज्याच्या तापमानात किंचित घट होईल.

हवामान खात्याने म्हटले आहे की, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहतील. छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कोस्टल कर्नाटक या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.