राज्यावर अवकाळीचं संकट! 'या' शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान?

Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. 

नेहा चौधरी | Updated: May 12, 2024, 07:28 AM IST
राज्यावर अवकाळीचं संकट! 'या' शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान? title=
maharashtra weather update unseasonal rain till 18 may orange alert in pune satara chandrapur

Maharashtra Weather Update in Marathi : मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला असून राज्यासह देशात अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अनेक भागांमध्ये पावासाचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

राज्यासह देशात उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे. (maharashtra weather update unseasonal rain till 18 may orange alert in pune satara chandrapur)

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.

'या' शहरांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कोसळलं असून आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे 12  ते 18 मे पर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बहुतांश जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.

तर  कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत कसं असेल वातावरण?

मे महिन्या उजाडला असल्याने मुंबईतील वातावरण कसं असेल याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाजनुसार शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि संध्याकाळपर्यंत अंशतः ढगाळ असणार आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35°C आणि 27°C च्या आसपास असेल.