MPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला

अमरावतीतल्या माला पापळकर या अंध तरुणीने MPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. 

Updated: May 19, 2024, 06:09 PM IST
MPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला    title=

अनिरुद्ध दवाळे, अमरावती, झी मीडिया : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या अमरावतीतल्या माला पापळकर या तरुणीने इतिहास घडवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत मालाची लिपिक आणि टंकलेखकपदी निवड झाली आहे. MPSC नं घेतलेल्या परीक्षेत तिनं हे लक्षवेधी यश मिळवल आहे. विशेष म्हणजे परिस्थितीवर मात करत तिनं ही कामगिरी केलीये. 

अंध असलेली माला 20 वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकात बेवारस आढळली होती. तिला तेव्हा अमरावतीतल्या अचलपूर तालुक्यातील अंबादासपंत वैद्य दिवांग बेवारस बालगृहाकडे सोपवण्यात आलं. तिथे तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि आता तिची सरकारी सेवेसाठी निवड झाली आहे. मेहनतीच्या जोरावर यशाची माळ प्राप्त करणारी माला इतरांसाठी आता प्रेरणास्थान ठरली आहे. 

शंकर बाबांनी तिला स्वीकारून माला हे नाव दिलं. यावेळी तिचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला व आधी कागदपत्राची पूर्तता करून या मुलीला मानस कन्या केलं.  मालाला सुरवातीला युनिक अकॅडमी चे संचालक अमोल पाटील यांनी स्वतःहून बाबाकडे जाऊन मालाच्या एमपीएससीच्या परीक्षेची तयारी ही जबाबदारी स्वीकारली. यावेळी अमोल पाटील यांनाही या तरुणीला आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारून एमपीएससीच शिक्षण दिलं. 

शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमातील माला नामक तरुणी एमपीएससी पास झाली त्यामुळे दिव्यांग ही आपल्या मेहनतीने आपल्या पायावर उभे राहून दिव्यांगांना प्रेरणा देऊ शकतात असं मालाने सिद्ध केलं त्यामुळे आता मला IAS व्हायचं असल्याचे मालाने सांगितले.  

जन्मत: अंध असलेल्या राहुलची दैदिप्यमान कागिरी

परिस्थितीवर मात करून जिंकण म्हणजे काय असते हे पंढरपूरातील राहूलने करून दाखवलय.  पूर्णपणे अंध असलेला राहूल गाजरे या विद्यार्थ्याने आपल्यातील कमतरता हीच ताकत बनवत दहावीच्या परिक्षेत 90.20 टक्के गुण मिळवलेत. राहुलचे आईवडील शेतमजूर आहेत. जन्मत: अंध असलेल्या राहुलला परिस्थितीला सामोर जाऊन जिंकायच कस हे आईवडीलांनी  शिकवल. आपल्या यशाच श्रेय आईवडील, शिक्षक आणि परिक्षेत उत्तरपत्रिका लिहणाऱ्या मदतनीस पुजा ढाळेला असल्याच राहूल नं म्हटलंय.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली तरुणीचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश

स्वाति किसन दाभाडे... मावळ तालुक्यात तळेगाव परिसरातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली तरुणी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून नायब तहसीलदार बनलीय. वडिलांचा तुटपुंजा शेतीचा व्यवसाय, आई भाजीपाला विक्री करुन संसाराचा गाडा हाकते. घरच्या या हलाखीच्या परिस्थितीमुळे बारावीनंतर स्वातीला ४ वर्षे शिक्षण सोडावं लागलं. याच काळात आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करुन आणि खासगी शिकवणीतून मिळणाऱ्या पैशातून तिने बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केलं. यानंतरही स्वाती थांबली नाही. एमपीएससीच्या खडतर अभ्यास करुन स्वातीने दैदिप्यमान यश मिळवलंय. त्यामुळे स्वातीवर कौतुकाचा वर्षावर होत असून ती माळवाडी गावची भूषण ठरलीय.