Maharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले

Maharashtra Mansoon Updates :  दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 9, 2023, 09:48 AM IST
Maharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले title=
Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Forecast : मान्सून काल केरळमध्ये दाखल झाला. ( Monsoon in Maharashtra) दरम्यान, काल राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आज दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला. झाडांची पडझड, केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात. अनेक गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता.

 जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि यावल तालुक्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला. वादळी वाऱ्यांमुळे अनेक झाडे उन्मळून पडलीत. तसेच केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात. अनेक गावांचा वीज पुरवठाही खंडित झाला आगे. घरांची आणि गोठ्यांची पडझड झाल्याने अनेक जनावरंही दगावली आहेत. तर रस्त्यांवरही मोठ मोठी झाडं पडल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.

13 जून रोजी मान्सून कोकणात दाखल 

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता राज्यात कधी दाखल होणार याची प्रतीक्षा आहे. (Monsoon News) हवामान खात्याने 13 जून रोजी मान्सून कोकणात दाखल होईल असा अंदाज वर्तवलाय. मात्र अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाचा जोर कमी असणार आहे. 1 जून रोजी मोसमी वारे केरळमार्गे भारतात दाखल होतात. यंदा 4 जूनपर्यंत पावसाचा अंदाज होता. मात्र त्यानंतरही चार दिवसांच्या विलंबानं पाऊस केरळमध्ये दाखल झाला. मोसमी पावसानं केरळचा 75 टक्के आणि तमिळनाडूचा 35 टक्के भाग व्यापलाय. वा-याच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्यामुळे पुढील 48 तासांत वारे कर्नाटकपर्यंत मजल मारतील. त्यानंतर गोव्यात 11 जून आणि 13 जूनपर्यंत कोकणात मोसमी पाऊस पडेल, असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

या राज्यांत हलका पाऊस पडण्याचा अंदाज

आज दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, कोस्टल आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर पंजाब आणि सिक्कीममध्ये हलका पाऊस पडेल असा अंदाज खासगी हवामान संस्था स्कायमेटने वर्तवला आहे. तमिळनाडू, रायलसीमा, कर्नाटक आणि पश्चिम हिमालयातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये धुळीच्या वादळासह हलका पाऊस पडू शकतो. 

दिल्ली-एनसीआरमध्ये दोन दिवसांच्या उष्णतेनंतर आज हवामान बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानुसान (IMD)दिल्ली-NCR आजपासून ढगाळ असू शकते आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. या बदलानंतर आजपासून लोकांना उकाडा आणि उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार आहे. पुढील चार दिवस कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली तर किमान तापमान 25 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता आहे. 

जून महिन्यातही उष्णतेचे चटके

भारतीय हवामान विभागानुसान, सध्या उत्तर भारतात सतत उष्णतेची लाट नाही. एप्रिल-मेनंतर आता जून महिनाही उष्णतेचे चटके बसत आहेत. 2024 नंतर प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, गेल्यावर्षी 9 एप्रिल ते 4 मे पर्यंत 13 दिवस उष्णतेची लाट होती. तर 2021 मध्ये याच कालावधीत 1 दिवस, 2020 मध्ये 4 दिवस आणि 2019 मध्ये एक दिवस उष्णतेची लाट होती.

मान्सून उत्तर भारतात किती वाजता पोहोचेल?

यावर्षीच्या मान्सूनबद्दल सांगायचे तर, केरळमध्ये मान्सूनची सुरुवात आठ दिवसांनी लांबली आहे. याचे कारण हवामान तज्ज्ञांनी चक्रीवादळ बिपरजॉयला सांगितले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की चक्रीवादळामुळे मान्सून केरळमधून उत्तर भारताकडे जाण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत दिल्ली-एनसीआरमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त होऊ शकते आणि लोकांना उष्णतेच्या लाटेसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.