विकृतीचा कळस! चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं अन् चावी...

Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले.

कैलास पुरी | Updated: May 19, 2024, 12:48 PM IST
 विकृतीचा कळस! चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं अन् चावी... title=
Pimpri Chinchwad Man inserts nails into wifes private parts puts lock on it

Pune Crime News:  पिंपरी-चिंचवडमध्ये विकृत मानसिकतेतून धक्कादायक घटना घडली आहे. आत्तापर्यंत आपण महिलेवर घरगुती हिंसाचारातून किंवा संशयातून अत्याचाराच्या बातम्या वाचल्या असतीलच. पण पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेला हा प्रकार वाचून तुमचंही मन विचलित होऊ शकते.  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या विकृत प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

आरोपीचे वय 30 वर्षे असून तो नेपाळी नागरिक आहे. आरोपीने 28 वर्षांच्या पत्नीवर तिचे बाहेर अफेअर असल्याचा संशय होता. 11 मे रोजी पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्या गुप्तांगावर ब्लेडने वार केले. तसंच, दोन्ही हात-पाय लोखंडी खिळ्याने गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडले. त्यानंतर तिथे पितळी कुलूप बसवलं, असल्याचं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पतीला पोलिसांनी अटक केली असून कुलपाची चावी शोधण्यात येत आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे घटनेला कित्येक तास उलटून गेले असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र पीडित महिलेच्या गुप्तांगावर लावलेले पितळी कुलूप चावी नसल्याने डॉक्टरांना काढता येत नव्हती. त्यामुळे अतीव वेदनेने पीडित महिला तडफडत होती. जखमी महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्या नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी गंभीर दखल घेत संबधित पती विरुद्ध भादवी 326,506 आणि 323 नुसार गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदनेने कळवळत असतानाही महिलेने पोलिसात पतिविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार, या अमानवी कृत्यानंतरही नराधम पतीने तिला मारहाण केली. पोलिसांनी या विकृत व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी हा एके ठिकाणी वॉचमनचे काम करतो आणि महिला गृहिणी आहे. या घटनेनंतर समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.