पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट; चार धरणांमध्ये किती पाणीसाठा उरलाय माहितीये?

Pune News : धरणातील पाणीसाठ्याचा आकडा पाहून चिंता आणखी वाढेल... आणखी किती दिवस पुरणार इतकासा पाणीसाठा? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी   

निलेश खरमारे | Updated: May 16, 2024, 11:17 AM IST
पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट; चार धरणांमध्ये किती पाणीसाठा उरलाय माहितीये?  title=
Pune news water shotrtage four dams consists 23 percent in total amount of water

निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : यंदाच्या वर्षीचा उन्हाळा अधिक तापदायक असल्याचं सुरुवातीपासूनच जाणवलं आणि मे महिन्यापासून या उष्णतेचा दाह आणखी वाढला. उकाड्यामुळं अनेकांच्या जीवाची काहिली होत असतानाच आता राज्याच्या काही भागांमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या डोकं वर काढताना दिसत आहे. तिथं सोलापूर आणि मराठवाड्याच परिस्थिती बिघडलेली असतानाच इथं पुण्यातही असंच काहीसं चित्र येत्या काही दिवसांमध्ये असाच उकाडा कायम राहिला तर पाहायला मिळू शकतो. 

थोडक्यात, सूर्याचा प्रकोप आणखी तीव्र झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावणार आहे. सध्याच्या ठघडीला पुण्यातील चारही  धरणांमध्ये अवघा 23 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे ही परिस्थिती दिवसागणिक आणखी भीषण होताना दिसत आहे. परिणामी पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला सध्या दिला जात आहे. फक्त पुणेच नव्हे, तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये हीच परिस्थिती आहे. 

मे महिन्यातील आणखी पंधरा दिवस आणि त्यानंतर जून महिन्यातही जाणवणारा उकाडा ही वस्तूस्थिती पाहता मान्सून योग्य वेळी राज्यात दाखल झाला नाही, तर हे संकट चिंता आणखी वाढवू शकतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोलले

पुण्यात कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? 

खडकवासला धरण- 61.51 टक्के 
उपलब्ध पाणीसाठा 1.21 TMC

पानशेत धरण- 18.99 टक्के 
उपलब्ध पाणीसाठा 2.02 TMC

वरसगाव धरण- 25.58 टक्के 
उपलब्ध पाणीसाठा 3.28 TMC

टेमघर धरण- 4.99 टक्के तर
उपलब्ध पाणीसाठा 0.19 TMC