जिथे आम्हाला जास्त मत मिळतायत तिथं दिरंगाई केली जातेय; उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले आहेत. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप  ठाकरेंनी केला आहे.

वनिता कांबळे | Updated: May 20, 2024, 05:02 PM IST
जिथे आम्हाला जास्त मत मिळतायत तिथं दिरंगाई केली जातेय; उद्धव ठाकरे यांचा आरोप  title=

Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting : मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. मतदार हे मतदानासाठी उतरले आहेत. मात्र, निवडणूक आगोय पक्षपातीपणा करत असल्याचे दिसत आहे. मतदान केंद्रांवर खूप दिरंगाई केली जात आहे. जाणून बुजून दोनदा तिनदा नावे तपासली जात आहेत. यामुळे मतदान केंद्रावर पोहचूनही अनेक वेळ ताटकळत थांबावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांकडून मुद्दामहून वेळ काढला जात आहे. दिरंगाई केली जात आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

अनेक मतदान केंद्रावर मुद्दामहून उशीर केला जात आहे. ज्या केद्रांवर अशा प्रकारे दिरंगाई केली जात आहे. तेथील मतदारांनी तात्काळ शिवसेना शाखांशी संपर्क साधावा.  त्या मतदान केंद्राचे नावे आणि त्याची माहिती आम्हाला द्या. मोदी सरकार जाणून बुजून निवणूक कर्मचाऱ्यांच्या मदतीने दिरंगाई करत आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नागरीकांनी पहाटे पाच वाजले तरी चालेले पण आपला मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले आहे. ज्या मतदान केंद्रावर अशा प्रकारे दिरंगाई झाली याची माहिती घेऊन मी त्या संबधीत मतदान केंद्रांची यादी जाहीर करेन असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या ठिकाणी आम्हाला म्हणजेच शिवसेने जादा मत पडत आहेत अशाच मतदान केंद्रावर दिरंगाई केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.