आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोप

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय. 

Updated: Apr 20, 2024, 09:24 PM IST
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोप  title=

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांना वेड लागलं आणि भ्रमिष्ट म्हणाले. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतलाय. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करू असा शब्द फडणवीसांनी दिल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला होता...त्यावर दोन्ही नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र पडणवीसांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.  उद्धव ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमुळे एकच खळबळ उडाली आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद हे अमित शाहांसोबत ठरलं होतं. देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करणार होते. फडणवीस मग त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात जाणार होते.  देवेंद्र फडणवीसांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 
उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीत अमित शाहांवरही तोफ डागली
उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनीही जोरदार पलटवार केलाय. उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावरुन ठाकरे गट आणि भाजपमध्ये जुंपलीय.  उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीत अमित शाहांवरही तोफ डागलीय.  मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्याचं वाटलं, अमित शाहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच सगळं बदललं.  महाजन, मुंडे, गडकरींसोबत जागावाटपावेळी रस्सीखेच व्हायची. नंतर भाजपच्या नेत्यांकडून अहंकाराची भाषा आणि आकडे दाखवले जाऊ लागले. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेवर हल्ला करता येईल असा भाजपचा समज झाला आणि 2019 मध्ये भाजपने तेच केलं असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. सेना आणि भाजपमध्ये सत्तेचं समान वाटप होईल असं शाहांसोबतच्या बैठकीत ठरल्याचं सांगत ठाकरेंनी पुन्हा एकदा अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख केलाय

उद्धव ठाकरेंचे याआधीचे दावे

2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता. मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहांसोबतच्या चर्चेत हा फॉर्म्युला ठरला होता. 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदासाठी मी एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यास तयार नव्हते.  तेव्हा शरद पवारांनी माझं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केलं.  उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीत फडणवीसांनी गद्दारी केली.. आदित्य ठाकरेंबाबतचा शब्द फिरवला असे नवे दावे करण्यात आले आहेत. मात्र जर शिवसेनेला पहिली अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळालं असतं. तर आदित्यला फडणवीस कसं तयार करणार होते. असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतोय.