तुमच्या नेल पॉलिशपासून चॉकलेट, जेली बीनमध्ये असतो हा किडा! किती जणांना माहिती आहे?

Trending News In Marathi: लाखेपासून बनवलेले दागिने तुम्ही कधी वापरले असतीलच पण तुम्हाला माहितीये का लाख कुठून मिळवली जाते. तर आज जाणून घ्या   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 20, 2024, 05:50 PM IST
तुमच्या नेल पॉलिशपासून चॉकलेट, जेली बीनमध्ये असतो हा किडा! किती जणांना माहिती आहे? title=
What Is Shellac insect uese in various industry know in marathi

Trending News In Marathi: तुम्ही वापरत असलेले सौंदर्यप्रसाधन, घरातील लाकडांना केलेले पॉलिश, फूड इंडस्ट्रीपासून इलेक्ट्रिकसारख्या वस्तुंमध्ये एका किटकाचा वापर केला जातो हे एकून तुम्ही आश्चर्यचकित झालात ना? पण हे खरं आहे. या कीटकापासून निर्माण होणाऱ्या स्त्रावाचा वापर भारतातील अनेक उद्यागक्षेत्रात केला जातो. भारतात प्राचीन काळापासून याचा वापर केला जातो. लाखेचा किटक (shellac) या किड्यापासून लाख मिळवली जाते. या लाखेचा वापर कित्येत उद्योगक्षेत्रात केला जातो. काही ठिकाणी तर याची शेतीही केली जाते. 

लाख किटकांच्या स्त्रावापासून लाख हा पदार्थ मिळतो. भारत थायलंड व म्यानमार या देशात हा किटक मोठ्याप्रमाणात आढळतात. भारतात या किटकाच्या 14 प्रजाती आढळतात. लाख हा लाल रंगाचा पदार्थ आहे. लाख किटक प्रामुख्याने पिंपळ, वड, बोर, कुसुम, खैर, पळस या झाडांवर आढळतात. हे किटक आकाराने अत्यंत सूक्ष्म असून ती परपोशी असते. स्वरक्षणासाठी हे किटक तोंडातून लाळ सोडून स्वतःभोवती आवरण तयार करतात. यातच मादी किटक अंडी घालतात. लाखेच्या या आवरणामुळं  किटकांचे संरक्षण होते. लाख स्त्रवल्यानंतर ती घट्ट होते. झाडांच्या फांद्यांवर व डहाळ्यावर ही लाख असते. 

किटकांना लाळ सोडल्यानंतर ही घट्ट होते. ज्या फांद्यावर ही लाख असते त्या तोडून लाख वाळल्यावर ती खरवडून काढली जाते. लाखेच्या अशा भुकटीवर प्रक्रिया करुन लाखेच्या कांड्या तयार केल्या जातात. लाखेचा वापर अनेक उद्योगांमध्ये केल्या जातो. लाखेच्या बांगड्या, दागिने किंवा लाखेचा वापर दस्तावेज करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. भारतात लाखेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काही ठिकाणी तर याची शेतीही केली जाते. लाखेवर प्रक्रिया करण्यासाठी लाख परिष्करण केंद्रदेखील आहेत. महाराष्ट्र राज्यात गोंदिया व गढचिरोली या जिल्ह्यांत लाखेचे उत्पादन घेतले जाते. 

लाखेचा उपयोग

लाखेचा उपयोग हा खाद्यपदार्थांना कोटिंग करण्यास, सौंदर्य प्रसाधन, वॉर्निश, फायर प्रुफिंग, रेशम किंवा कॉटनचे कपडे डाय करण्यास, फरशी पॉलिश करण्यासाठी, शाही, इलेक्ट्रिक, हेअर स्प्रे, सोन्याचे आभूषण घडवण्यासाठी लाखेचा वापर केला जातो. 

लाखेचे उप्तन्न आणि खर्च

लाखेच्या उत्पादनात भारत आघाडीवर आहे. भारतात लाखेच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल कोटींच्या घरात आहे. एका झाडापासून जवळपास 700 ते  800 रुपयांचे उत्पादन मिळते. मात्र, त्या तुलनेत खर्च 100 रुपयांपेक्षाही कमी आहे. तर एक किलोग्रॅम लाख बाजारात 400 ते 500 रुपयांना विकली जाते. या शेतीसाठी कोणतीही फार मोठी गुंतवणूक करावी लागत नाही.