Inflation News : महागाईच्या शर्यतीत लिंबाची एंट्री! ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Weather Update News : राज्यातून गेल्या काही दिवसांपासून बोचरी थंडी गायब झाली आहे. मार्च महिन्याला सुरु व्हायला अवघे काही दिवस आहे. अशात उन्हाच्या झळा लागायला लागल्या आहे. सर्वसामान्याची उन्हाळ्यात गोडी देणारा आणि घशा सुकविणारा लिंबू सरबत आता तुमच्या खिशाला कात्री लावणार आहे.   

Updated: Feb 22, 2023, 08:00 AM IST
Inflation News : महागाईच्या शर्यतीत लिंबाची एंट्री! ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री title=
Lemons entry in the inflation race green chillies Increase in prices Maharashtra Summer Weather Update News mumbai in marathi

Increase in prices in marathi : राज्यासह (Maharashtra Summer) संपूर्ण देशातून थंडी हळूहळू नाहीशी झाली आहे. आता उन्हाची चाहुल लागली आहे. फेब्रुवारी (February)  महिन्यातच सर्वसामान्यांच्या अंगाची लाहीलाही (Heat Wave) होतं आहे. अशात घशाला ओलावा देणारे शीतपेय आणि लिंबू सरबत (Lemon syrup) यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. पण आता हे लिंबू सरबताची (Lemon Price Hike) गोडी सर्वसामान्यांना कडू लागणार आहे. दिवसेंदिवस महागाईच्या ( Inflation News) झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना ऐन उन्हाळात आणखी एक झटका बसला आहे. लिंबूच्या किंमतीत घसघशीत वाढ झाली आहे. (Lemons entry in the inflation race green chillies Increase in prices Maharashtra Summer Weather Update News mumbai in marathi )

लिंबू एवढा का महागला? 

बाजारात लिंबाची आवक कमी झाल्यामुळे लिंबाच्या किंमतीत वाढ झाल्याचं बाजार तज्ज्ञ सांगतात. आवक कमी आणि मागणी जास्त...उन्हाळ्यात लिंबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसं तर 12 ही महिने लिंबाला मागणी असते. कोरोना काळात लिंबू पाणी हे शरीरासाठी फायद्याचं आहे हे कळल्यावर आजही रोज सर्वसामान्य लिंबू सरबत घेतात. लिंबू हे गुणकारी आहे. त्यामुळे ते प्रत्येकाचा किचनचा एक भाग असतो. मात्र आता हा लिंबू कडू लागणार आहे. कारण वाढलेल्या मागणीमुळे लिंबू प्रति किलो 10 ते 15 रुपयांनी महागला आहे. (mumbai news)

किती टक्काने आवक घटली? 

एपीएमसीसह (APMC Market) मुंबई उपनगरातील बाजाराचा विचार केला तर आतापर्यंत लिंबूची आवक ही 120 टन होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यात घट झाली असून 30 ते 40 टक्क्यांनी आवक घटली आहे. आता लिंबूचे भाव वधारल्यामुळे बाजारात 60 रुपये किलो दराने मिळणारा लिंबू आता 70 ते 75 रुपयांनी मिळतोय. 

हिरवी मिरची आणखी तिखट!

लिंबू पाठोपाठ हिरव्या मिरचीची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात हिरव्या मिरचीने चाळीशी पार केली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो 30 रुपयांने मिळणारी मिरची आता 40-46 रुपयांना मिळते आहे. याचा अर्थ मिरचीच्या किंमतीत 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे.