Mumbai Crime : मुंबईतील ओशिवरा परिसरात खुलेआम गुंडगिरी, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Crime News : मुंबईतील ओशिवरा परिसरातील मारहाण प्रकरणात, तक्रारीच्या आधारे 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 8, 2024, 11:07 PM IST
Mumbai Crime : मुंबईतील ओशिवरा परिसरात खुलेआम गुंडगिरी, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल title=
Mumbai Crime News hooliganism in Oshiwara

Mumbai Crime News : मुंबईतील ओशिवरा परिसरात सार्वजनिक मारामारी आणि गुंडगिरीचा एक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ 6 मे रोजी रात्री 10.30 च्या सुमारास आहे. आरोप असा  आहे की, मेमन रिअल्टर्सचे मालक शब्बीर मेमनने त्याच्या साथीदारांसह परिसरातील प्रॉपर्टी डीलर विकी सय्यद यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. ज्यात मोहम्मद ताहिर माडीवाला नावाचा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV Video) कैद झाली आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शब्बीर मेमन पोलिसांच्या (Mumbai Police) कारवाईला इतका घाबरला आहे की, अयदीन या परिसरात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी त्याच्या बाऊन्सरद्वारे अशा घटना घडवून आणत असतो, असा आरोप आहे. यावर पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिलीये. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन पाटील म्हणाले, "आम्ही तक्रारीच्या आधारे 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे."

ओशिवरा पोलिसांनी शब्बीर मेमन, त्याचा भाऊ शोएब मेमन आणि फवाद मेमन यांच्यासह एकूण आठ आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम ३२४, १४३, १४६, १४७ आणि १४९ अंतर्गत एफआयआर नोंदवला. आरोपींची तात्काळ जामिनावर सुटका करण्यात आली, तर पोलिसांनी पीडितेविरुद्ध क्रॉस एफआयआरही दाखल केला.

दरम्यान, या आरोपींविरुद्ध जमीन बळकावणे आणि जमिनीच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यापूर्वीही काही तक्रारी नोंदविण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मुंबई पोलीस ताज्या आरोपांचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

मुंबईतील इतर क्राईम स्टोरी

मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करणाऱ्या इमरान अली खान नावाच्या व्यक्तीला मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. वाढत्या वयामुळे लग्न करता येत नसलेल्या मुंबईच्या पीडित महिलेला इम्रान खानने लक्ष्य केलं होतं. 

परदेशात पाठण्यात आलेल्या पार्सलमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्यामुळे अटकेची भीती घालून एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याची सुमारे साडेआठ लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी दोघांना अटक केली. प्रवीण कोकणे आणि संतोष रेडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.