शिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल

Mumbai News : 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत सोसायटीत मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा न प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Sep 28, 2023, 07:40 AM IST
शिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल title=
mumbai mulund marathi woman denying house state commission for women instructions Rupali chakankar Action

 देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई:  मुंबईतील मुलुंडमध्ये महिलेला 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत घर नाकाराल्य आहे. या प्रकरणाची वाचा महिलेने सोशल मीडियावर उघड केल्यानंतर एकच खळबळ माजली. सोशल मीडियावर महिलेने आपली व्यथा मांडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एवढंच नाही तर या सोसायटीच्या सचिवांनी अरेरावीची भाषा केली आणि हुज्जत घातली असा आरोप महिलेने केला आहे. त्यासोबत महिलेच्या नवऱ्याला मारहाण केल्याचंही महिलेने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. या प्रकरणानंतर एकच खळबळ माजली आहे. (mumbai mulund marathi woman denying house state commission for women instructions Rupali chakankar Action)

ही घटना व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठी भाषिक महिलेला सदनिका नाकारली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे ह्या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना चौकशी करून अहवाल मागविण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे याप्रकरणी संबंधित महिलेला भाषेच्या आधारे दुय्यम  वागणूक देऊन  मारहाण करण्यात आल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहेत, असं ट्वीट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनी केलं आहे. 

तृप्ती देवरूखकर असं या महिलेचं नाव आहे. मुंबईत मराठी माणसांवर अन्याय कमी होताना दिसत नाही आहे. मुलुंडमधील घटनेनंतर राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. नाना पेटोले, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे कृत्य लाजीरवाण असून मराठी माणसाचा अपमान करण्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. 

अजित पवार यांनी या घटनेबद्दल म्हणाले की, ''अशा पद्धतीने हे अजिबात चालणार नाही. कुणाची मक्तेदारी चालू देणार नाही आणि सहनही करणार नाही. माहिती घेतली जाईल या घटनेची. जर यात तथ्य असेल तर गंभीरतेने नोंद घेवू. मराठी माणसाचा असा अपमान करण्याचा कदापि धाडस होणार नाही अशी भूमिका घेवू.'' 

दरम्यान या सगळ्या घटनेची दखल मनसे घेतली. त्यानंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुलुंडमधील शिवसदन या सोसायटीमध्ये जाऊन रहिवाशांना जाब विचारला आणि या महिलेची माफी मागण्यास भाग पाडलं.  काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे गट मनसे या सगळ्यांनीच या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी केली. मात्र या घटनेवरून आता मनसेने ठाकरे गट आणि आदित्य ठाकरे यांना डिवचल आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात केम छो वरळी अशा पद्धतीचे बॅनर ठाकरे गटाकडून लावण्यात आले होते त्यावरूनच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. संदीप देशपांडे म्हणतात, "केम छो  वरळी "होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज आणि हिम्मत आली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हणतात ह्यांचा माज उतरवल्या शिवाय राहणार नाही.