टाटांकडून 7.5 लाख वीज ग्राहकांना दिलासा! वीजबिलात होणार मोठी कपात

Tata Power : अपिलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटीने दिलेल्या आदेशानंतर टाटा पॉवरच्या लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आदेशामुळे आता टाटा पॉवरच्या ग्राहकांच्या वीजबिलात मोठी कपता होणार आहे.

Updated: Jul 14, 2023, 09:06 AM IST
टाटांकडून 7.5 लाख वीज ग्राहकांना दिलासा! वीजबिलात होणार मोठी कपात title=
(फोटो सौजन्य - Reuters)

Tata Power : अपिलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटी (APTEL) ने पारित केलेल्या अंतरिम आदेशाने टाटा पॉवरच्या 2023-24 च्या महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (MERC) टॅरिफ शेड्यूलला स्थगिती दिली आहे. त्यामुळे टाटा पॉवरच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. टाटा पॉवरच्या ग्राहकांना 2020 च्या मागील टॅरिफ ऑर्डरनुसार वीजबिल देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सर्व श्रेणीतील 7.5 लाख ग्राहकांना वीजबिलात 25-35 टक्के सूट मिळणार आहे.

 ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये वीज दरातील कपात तात्काळ प्रभावाने दिसून येणार आहे. तसेच, अपिलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटीच्या आदेशाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व ग्राहकांसाठी हा दरातील फरक भविष्यातील वीज बिलांमध्ये योग्यरित्या जोडला जाईल. त्यामुळे आमच्या ग्राहकांच्या वीजबिलात अधिक बचत होणार आहे, असे टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर हा अंतरिम आदेश आहे आणि पुढील सुनावणी ऑक्टोबरमध्ये होणार आहे, तर अंतिम आदेशाची वाट पाहिली जात आहे, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

टाटा पॉवरने 2023-24 आणि 2024-25 च्या दरावर स्थगिती मिळवण्यासाठी मे महिन्यात अपिलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटीकडे संपर्क साधला होता. टाटा पॉवरच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या म्हणण्यानुसार दर त्यांच्यापेक्षा जास्त होते. यासोबतच अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई आणि बेस्ट सारख्या प्रतिस्पर्धी वितरण कंपन्यांकडे ग्राहकांचे होणारे स्थलांतर रोखणे हा देखील या आदेशाविरुद्ध अपील करण्याचा उद्देश होता.

1 एप्रिलपासून वीज दरवाढीमध्ये विसंगती असल्याने टाटा पॉवरने अपिलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटी आव्हान दिले होते. टाटाच्या पुरवठ्याची सरासरी किंमत खूपच कमी आहे आणि तरीही आमचे टॅरिफ जास्त आहेत, असे टाटाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता आदेश आल्यानंतर गुरुवारी रात्री टाटा पॉवरने जारी केलेल्या निवेदन जारी केले आहे. "31 मार्च 2020 रोजी कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला प्रस्तावित केलेले, पुन्हा एकदा लागू होईल. हा दर सध्याच्या दरापेक्षा 25-35 टक्के कमी आहे आणि त्याचा फायदा ग्राहकांना होईल," असे टाटाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.