Crime News : भरदिवसा बायफ्रेंड समोरच तरुणीवर बलात्कार केला आणि... डोंबिवलीतील धक्कादायक घटना

डोंबिवलीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: Jan 29, 2023, 07:18 PM IST
Crime News : भरदिवसा बायफ्रेंड समोरच तरुणीवर बलात्कार केला आणि... डोंबिवलीतील धक्कादायक घटना title=

Dombivli Crime News :  डोंबिवली बलात्काराच्या घटनेमुळे हादरली आहे.  बायफ्रेंड समोरच एका तरुणीवर बलात्कार झाला आहे.  ती प्रियकारासह फिरायला गेली असताना तिच्यासह हा धक्कादायक प्रकार घडला. दोघा नराधमांनी बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ देखील बनवला आहे. पोलिसांनी अवघ्या 30 तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे (Dombivli Crime News).  डोंबिवली जवळील ठाकुर्ली परिसरात असलेल्या खाडी किनारी ही घटना घडली आहे. पीडीत तरुणी तिच्या प्रियकरासह खाडी किनारी फिरायला आली होती. या अल्पवयीन मुलीवर दोघा नरधमांनी भर दिवसा बलात्कार केला.

पीडीत मुलगी तिच्या प्रियकरासह येथे फिरत होती. यावेळी दोघे जण त्यांच्याजवळ आले. दोघांनी पोलीस असल्याची बतावणी  करत यांना भिती दाखवली. यानंतर प्रियकराला धमकावत दोघा नराधमांनी  या मुलीवर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीवर बलात्कार करतांना यातील एका आरोपीने मोबाईलमध्ये अत्याचार करतानाची दृश्य देखील चित्रित केले होते. तसेच या घटनेची माहिती कोणाला दिली तर बदनामी करू अशी धमकी दिली होती. नराधमांच्या तावडीतून सुटका झाल्या नंतर तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठले.  

याप्रकरणी डोंबिवली विष्णू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीची दखल घेत तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या 30 तासांच्या आत बलात्कार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  विष्णू भांडेकर आणि आशिष गुप्ता अशी या अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. आरोपी विष्णूला नेवाळी तर आशिषला डोंबिवली पूर्व परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  यातील आरोपी असलेल्या विष्णू भांडेकर याच्यावर यापूर्वी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली आहे. 

ठाकुर्ली परिसरातील जंगल परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमार ही घटना घडली होती. नराधमांनी पोलीस असल्याचे सांगत बलात्कार केला होता. या घटनेने डोंबिवली शहर हादरले होते. मात्र, पोलिसांनी आरोपींचे कोणताही धागादोरा नसतांना केवळ तांत्रिक महितीच्या आधारे अवघ्या 30 तासाच्या आत या प्रकरणातील आरोपीना अटक केली आहे.