पाकिस्तानात चिमुरड्यांच्या पॉर्न फिल्म्सचा धंदा, २८० मुलांचे ४०० व्हिडिओ जप्त

पाकिस्तानात लहान मुलांच्या पॉर्नोग्राफी रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गावातून जवळपास २८० लहान मुलांच्या ४०० हून अधिक पॉर्न व्हिडिओ जप्त केले गेलेय.

Updated: Aug 9, 2015, 11:47 AM IST
पाकिस्तानात चिमुरड्यांच्या पॉर्न फिल्म्सचा धंदा, २८० मुलांचे ४०० व्हिडिओ जप्त title=

कराची: पाकिस्तानात लहान मुलांच्या पॉर्नोग्राफी रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गावातून जवळपास २८० लहान मुलांच्या ४०० हून अधिक पॉर्न व्हिडिओ जप्त केले गेलेय.

या पॉर्न व्हिडिओमध्ये लहान मुलांकडून जबरदस्तीनं अश्लील कृत्य करवत होते. पाकिस्तानमधील वृत्तपत्र 'द नेशन'च्या रिपोर्टनुसार, पॉर्न व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकाधिक मुलांचं वय १४ वर्षांपेक्षा कमी आहे. व्हिडिओमध्ये शोषणाची परिसीमा गाठलीय. कारण १४ वर्षाच्या मुलालाकडून १० वर्षाच्या मुलीचं शोषण करतांना यात दाखवलं आहे.

बातमीनुसार यामागे २५ तरुणांचा हात आहेय हे लोकं व्हिडिओ बनवून मुलांच्या कुटुंबियांना ब्लॅकमेल करत होते. मुलांच्या कुटुंबियांकडून पैसे उकळण्यासाठी त्यांनी हा धंदा चालवला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लैंगिक अत्याचाराची एक व्हिडिओ कॉपी जवळपास ५० रुपयांना विकली जायची. अशा हजारो कॉपी त्यांनी विकल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणात ५ जणांना अटक केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.