'जिंदा' है... दाऊदचा दुश्मन नं. 1! छोटा राजनचा फोटो 'झी २४ तास'वर

तब्बल 9 वर्षांनी छोटा राजनचा फोटो जगासमोर आल्यानं दाऊद आणि त्याच्या दुश्मनीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय.

Apr 21, 2024, 20:54 PM IST

Chhota Rajan : छोटा राजन... कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन... माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा दुश्मन नंबर 1... याच छोटा राजनचा लेटेस्ट फोटो झी २४ तासच्या हाती आलाय... या फोटोमध्ये छोटा राजन एकदम फिट आणि तंदुरुस्त असल्याचं स्पष्ट दिसतंय.

1/9

दाऊद इब्राहिमचा सर्वात कट्टर दुश्मन अशी छोटा राजनची ओळख आहे.

2/9

कोरोना काळात छोटा राजनचा पहिला फोटो समोर आला होता. एम्समध्ये उपचार घेताना ते पहिल्या फोटोत दिसत होते. त्यावेळी छोटा राजनचा मृत्यू झाल्याची अफवा देखील पसरली होती. मात्र डॉन जिवंत असल्याचं नंतर स्पष्ट झालं. आता छोटा राजनची तब्येत एकदम ठणठणीत असल्याचं ताज्या फोटोवरून दिसतंय.  

3/9

सध्या तिहार जेल नंबर १ मध्ये एका हायसिक्युरिटी बराकमध्ये तो तुरुंगवास भोगतोय. याच तिहारच्या जेल नं. २ मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ठेवण्यात आलंय.

4/9

9 वर्षांनी छोटा राजनचा फोटो जगासमोर आला आहे. या फोटोमध्ये छोटा राजन एकदम फिट आणि तंदुरुस्त असल्याचं स्पष्ट दिसतंय.

5/9

 छोटा राजन याला तिहार जेलमध्ये ज्या कोठडीत त्याला ठेवलंय, तिथं कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

6/9

 छोटा राजनच्या जीवावरील धोका अजूनही टळलेला नाही. डी कंपनी त्याचा गेम करण्यासाठी अजूनही प्रयत्नशील असल्याचं समजतंय.

7/9

एका फोन कॉलच्या आधारे त्याला बालीमध्ये अटक करण्यात आली. सध्या छोटा राजन तिहार जेलमध्ये तुरुंगवास भोगतोय.  

8/9

25 ऑक्टोबर 2015 रोजी छोटा राजनला भारतीय गुप्तचर यंत्रणेनं इंडोनेशियामधून अटक केली होती.

9/9

कधीकाळी तो दाऊदचा एकदम खास माणूस होता 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद आणि छोटा राजन एकमेकांच्या जीवावर उठले. याच गँगवॉरमधून मुंबई, दुबई, नेपाळमध्ये एकमेकांच्या गँगमधील अनेकांची मुडदे पाडण्यात आले. छोटा राजनवरही दाऊद गँगकडून अनेकदा प्राणघातक हल्ले करण्यात आले होते.