भारतीयांकडे तब्बल 27 हजार टन सोनं, गोल्ड लोन कितीचं घेतलंय माहितीय का?

Gold Loan News:देशातील गोल्ड लोन मार्केटमध्ये संघटित क्षेत्रातील भागीदारी 40 टक्के इतकी आहे.

| Mar 24, 2024, 07:46 AM IST

Gold Loan News:देशातील गोल्ड लोन मार्केटमध्ये संघटित क्षेत्रातील भागीदारी 40 टक्के इतकी आहे.

1/8

भारतीयांकडे तब्बल 27 हजार टन सोनं, गोल्ड लोन कितीचं घेतलंय माहितीय का?

Gold Loan News Indians have as many as 27 thousand tons of gold

सोनं हा भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मुल जन्माला आल्यापासून ते मुलांचे लग्न, घरातील शुभकार्य, शुभमुहुर्त सर्ववेळेस थोडं का होईना सोनं खरेदी केलं जातं.  सोन्याच्या किंमतीत सध्या उतार पाहायला मिळतोय.

2/8

विविध मार्गाने गोल्ड लोन

Gold Loan News Indians have as many as 27 thousand tons of gold

अनेकदा लोकांना पैशांची गरज असते तेव्हा बॅंका, पतपेढ्या अशा विविध मार्गाने गोल्ड लोन घेतलं जातं.

3/8

12.22 टक्के वाढ

Gold Loan News Indians have as many as 27 thousand tons of gold

देशामध्ये गोल्ड लोनचं मार्केट साधारण 15 लाख कोटींचं आहे. रिझर्व बॅंकेच्या आकड्यानुसार हे मार्केट गेल्या एका वर्षात 17 टक्क्यांनी वाढले आहे. सोन बाजारात लावण्यात येणाऱ्या अंदाजानुसार, 2029 मध्ये यामध्ये 12.22 टक्के वाढ होऊ शकते.

4/8

भागीदारी 40 टक्के

Gold Loan News Indians have as many as 27 thousand tons of gold

देशातील गोल्ड लोन मार्केटमध्ये संघटित क्षेत्रातील भागीदारी 40 टक्के इतकी आहे. हा आकडा 6 लाख कोटींच्या आसपास आहे. या हिशोबाने पाहायला गेलं तर गोल्ड लोन मार्केट साधारण 15 लाख कोटींचं आहे.

5/8

संघटित व्यवसाय 10 लाख कोटी

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, 2029 पर्यंत गोल्ड लोनचा संघटित व्यवसाय साधारण 10 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामध्ये बॅंकेची 40 टक्के आणि एनबीएफसीची 60 भागीदारी आहे.

6/8

5300 टन सोनं तारणं

Gold Loan News Indians have as many as 27 thousand tons of gold

भारतीय परिवारांकडे साधारण 27 हजार टन सोनं आहे. यातील 20 टक्के म्हणजेच 5300 टन सोनं तारणं ठेवण्यात आलंय.

7/8

17 टक्क्यांनी वाढ

Gold Loan News Indians have as many as 27 thousand tons of gold

गेल्या एका वर्षात सोन्याची किंमत 16.6 टक्क्यांनी वाढली आहे. तर गोल्ड लोनमध्ये साधारण 17 टक्क्यांनी वाढ झालीय. सलग चाललेला ट्रेण्ड पाहता आरबीआयने गोल्ड लोन देणाऱ्या बॅंका आणि एनबीएफसीतील नियम कडक केले आहेत. 

8/8

किंमत सर्वोच्च स्थानी

Gold Loan News Indians have as many as 27 thousand tons of gold

यावेळेस सोन्याची किंमत सर्वोच्च स्थानी आहे. दिल्ली मार्केटमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66 हजार 914 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. एका दिवसात सोन्याच्या किंमतीत 1225 रुपयांची वाढ पाहायला मिळाली.