'हीरामंडी'च्या शर्मिनचं खऱ्या आयुष्यातील सासर किती श्रीमंत माहितीये? पतीसोबतचे फोटो व्हायरल

Heeramandi actress Sharmin Segal : काही प्रत्यक्ष प्रसंग आणि काल्पनिक कथानकाच्या बळावर उभी राहिलेली आणि कलेचा अप्रतिम नजराणार असणारी ही कलाकृती आहे, 'हीरामंडी'.  

May 16, 2024, 15:22 PM IST

Heeramandi actress Sharmin Segal : सोशल मीडिया सुरु करा किंवा एखाद्या गप्पा मारणाऱ्या गटासोबत जाऊन बसा, अनेक ठिकाणी एकाच कलाकृतीची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. 

1/8

हीरामंडी

Heeramandi actress Sharmin Segal in laws wealth worth Rs 53800 crore know her husband name

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित (Heeramandi) 'हीरामंडी' या वेब सीरिजचीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या सीरिजमधील प्रत्येक पात्र सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असतानाच एका कलाकार मात्र यास अपवाद ठरत आहे.   

2/8

आलमझेब

Heeramandi actress Sharmin Segal in laws wealth worth Rs 53800 crore know her husband name

हे नाव म्हणजे शर्मिन सेगल. 'आलमझेब' हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री शर्मिन सेगलला सध्या प्रचंड ट्रोल केलं जात असून तिच्या अभिनयावर अनेकांनीच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. 

3/8

चर्चेचा विषय

Heeramandi actress Sharmin Segal in laws wealth worth Rs 53800 crore know her husband name

एकिकडे या शर्मिनवर टीका होत असतानाच दुसरीकडे तिची संजय लीला भन्साळी यांची भाची म्हणून असणारी ओळखही चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरत आहे.   

4/8

शर्मिन सेगल

Heeramandi actress Sharmin Segal in laws wealth worth Rs 53800 crore know her husband name

मुख्य भूमिकेत झळकलेल्या 6 सौंदर्यवतींपैकी एक असणारी शर्मिन सेगल दीपक आणि बेला सेगल यांची लेक. सध्या तिचे वडील Applause Entertainment मध्ये कंटेंट हेड आहेत. तर, आई एका आघाडीच्या निर्मिती संस्थेमध्ये editor म्हणून काम पाहते.  

5/8

2023 मध्ये लग्न

Heeramandi actress Sharmin Segal in laws wealth worth Rs 53800 crore know her husband name

1995 मध्ये जन्मलेल्या भन्साळींच्या या भाचीनं 2023 मध्ये अमन मेहता नावाच्या व्यावसायिकाशी लग्न केलं. उद्योग जगतात मोठं नाव असणाऱ्या समीर मेहता या धनाढ्य व्यावसायिकाची शर्मिन सून आहे.   

6/8

सासरची संपत्ती

Heeramandi actress Sharmin Segal in laws wealth worth Rs 53800 crore know her husband name

फार्मा, वीज, गॅस आणि डायग्नोस्टीक सेक्टरमध्ये मेहता यांची कंपनी काम करत असून, Bloomberg Billionaires Index नुसार समीर मेहता यांच्या एकूण संपत्तीचा आकडा आहे  $6.44 billion म्हणजेच 53 800 कोटी रुपये. 

7/8

कारकिर्दीची सुरुवात

Heeramandi actress Sharmin Segal in laws wealth worth Rs 53800 crore know her husband name

शर्मिननं तिच्या कारकिर्दीची सुरुवात 'गोलियों की रासलीला राम लीला' या चित्रपटातून केली होती. तेव्हा ती अवघ्या 18 वर्षांची होती.   

8/8

कलाकृती

Heeramandi actress Sharmin Segal in laws wealth worth Rs 53800 crore know her husband name

याशिवाय 'मेरी कोम', 'बाजीराव मस्तानी' आणि 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटांसाठी तिनं असिस्टंट म्हणून काम पाहिलं होतं. 'हीरामंडी' ही शर्मिनची पहिलीच वेब सीरिज असून आता येत्या काळात या कलाजगतात तिला कोणत्या कलाकृती मिळतात आणि त्या संधीचं ती कसं सोनं करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.